कोरोनाने अनेकांना त्रस्त करून सोडले. अशा स्थितीत मानसिक ताणतणाव निर्माण होणे साहजिक आहे. अनेकांनी कोरोनाला हलक्यात तर कुणी गांभीर्याने घेतले. अनेकांनी कोरोना महामारीवर मात करण्यासाठी विविधांगी उपायही योजले. एखाद्या कुटुंबात कोरोना रुग्ण आढळला यानंतर कुटुंबातील अन्य सदस्यांनी उपाययोजनेसाठी स्वतःहून औषध घेतली. पाचपैकी एखाद्या सदस्याला कोरोना झाला असेल तर इतर चार सदस्यांनी डॉक्टरांना न सांगताही औषधे घेतली आहेत. पण मानवी शरीरातील बदल सातत्याने घडत असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे खाऊ नयेत असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बॉक्स
डिप्रेशन का वाढले
पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत डिप्रेशन अधिक जाणवल्याचे दिसून आले. वारंवार कोरोना महामारीबाबत ऐकल्यामुळे, होणाऱ्या मृत्यूबाबत ऐकणे यामुळे डिप्रेशन वाढत गेले. त्यासोबतच लॉकडाऊन, मंदीमुळे उद्योग व व्यवसाय ठप्प पडले.
घरी खायचे काय, असा प्रश्नही अनेकांसमोर उपस्थित झाल्याने डिप्रेशन वाढतच गेले. सुविधा नसतानाही संकटाचे दिवस कसे काढायचे, असा सवालही उपस्थित होत गेला. त्यामुळे टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
हे टाळण्यासाठी काय कराल
कोरोना महामारीत अनेकांना अनेक प्रश्न उपस्थित झाले. घरची स्थिती थांबवायची कशी? असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. विशेष म्हणजे कोरोनाबाबत जास्त मनावर घेऊ नये. नियमांचे पालन केल्यास आपल्याला काहीच होणार नाही, असे मनावर बिंबवले पाहिजे. चांगल्या व सकारात्मक साहित्य वाचन याकडे लक्ष दिले पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन व स्वत:वरील आत्मविश्वास हीच सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे.
कितीही डिप्रेशन किंवा कितीही संकटे आली तरी त्याचा प्रभावतेने सामना करा. आलेली वेळ निघून जाते, परंतु मानवी इच्छेसमोर व प्रबळ आत्मबळासमोर कोणतेही संकट येऊ शकत नाही.
बॉक्स
औषध विक्री वाढली
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीव गेले. कुटुंबातील व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर कुटुंबातील अन्य व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तर कधी घरगुती उपाय अंतर्गत आयुर्वेदिक औषधेही घेतली आहेत. त्या काळात औषधांची मागणी खऱ्या अर्थाने वाढली होती, यात दुमत नाही. मात्र ही मागणी कुटुंबीयातील सदस्यांवर आलेल्या चिंतेचे कारणामुळे असू शकते. परंतु हा बचावात्मक उपाय म्हणूनही औषधांचे सेवन केले आहे.
-सोनू करंजेकर, औषध विक्रेता, भंडारा.
बॉक्स
कोरोनामुळे अनेकांचा आर्थिक आधारही हिरावला. परिणामी चिंताही वाढली. कुणी आयुर्वेदिक तर कोणती ॲलोपॅथीची मागणी केली. कोरोना काळातील टेन्शन सातत्याने आम्हाला जाणवले. यावर आधारित बाजारात उपलब्ध असलेली औषधांची विक्री हमखास वाढली होती.
- संजय निंबार्ते, औषधी विक्रेता, भंडारा.