भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील बुद्धविहाराला पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम व पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी तथा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी सदिच्छा भेट दिली. पालकमंत्र्यांनी सिल्ली येथील मिनी दीक्षाभूमी बुद्धविहाराची पाहणी करून आवारातील तथागत गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या पूर्णाकृती मूर्तींचे पूजन केले. बुद्धविहाराची सुंदर रचना बघून बुध्दविहार समितीचे तसेच ही वास्तू बनविण्यात मदत करणारे आंबेडकर वाॅर्ड सिल्ली येथील तरुण, तरुणी, आबालवृध्द व महिलावर्गांच्या कामगिरीचे कौतुक करून या पध्दतीची वास्तू आपण कुठेच न बघितल्याचे सांगून कोणतीही मदत लागेल तर आम्ही करू, असे आश्वासन दिले.
मिनी दीक्षाभुमीची सदिच्छा भेट घडवून आणण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रसन्न चकोले यांची महत्त्वाची भूमिका होती. या भेटी दरम्यान प्रसन्न चकोले, सिल्लीचे सरपंच निर्भय क्षीरसागर, लोकेश मेश्राम, निराशा गजभिये, बुद्धविहार समितीचे अध्यक्ष राकेश मेश्राम, सचिव सांमत सुखदेवे, पत्रकार उल्हास तिरपुडे, विवेक गजभिये, दिगांबर मेश्राम, रमेशचंद्र गजभिये, अंबादास गजभिये, गौतम मेश्राम, चंद्रमणी सरादे, किशोर हुमने, दीपक मेश्राम, सुरेंद्र शालिक मेश्राम, नागसेन हुमने, प्रकाश हुमने, दुर्योधन सुखदेवे, शालू तिरपुडे, सुनीता गजभिये, बेबीनंदा गजभिये, देवागंना गजभिये, विनीत देशपांडे, रिजवान काझी, शेरू शेख व संपूर्ण समाजबांधव उपस्थित होते.