आसगाव येथून दारूची तस्करी प्रतिबंधित जिल्ह्यात होत असल्याची माहिती भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून रविवारी सकाळी धाड टाकण्यात आली. तेव्हा दारूभट्टीमधून नोकराच्या मदतीने दारू कारमध्ये दारू भरत असल्याचे दिसून आले. आसगाव येथील देशी दारूभट्टीचा चालक तुलसी ऊर्फ तुळशीदास वामनराव पडोळे (३७), गेंदलाल ऊर्फ संतोष गुणाजी घोशीकर (३४) रा. बजरंग वार्ड पवनी यांच्यासह पसार झालेल्या एका नोकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारमध्ये ७ पेट्या मधील ३३६ पव्वे, २० पेट्या मधील २००० टिल्लू पव्वे व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाई पवनीचे पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर, धर्मेन्द्र बोरकर, विजय राऊत, राजू दोनोडे, शैलेश बेदुरकर, सचिन देशमुख, पंकज भित्रे यांनी केली.
आसगाव येथे कारसह देशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:33 AM