केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवून या उपक्रमासाठी राज्यातील १४ पंचायतराज संस्थांची निवड करण्यात आल्याचे कळविले आहे. त्यानुसार, ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. या उपक्रमासाठी भंडारा, गोंदिया, अहमदनगर, जालना, गडचिरोली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलडाणा, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत व पंचायत समितीची निवड करण्यात आली आहे.
आझादी का अमृत महोत्सव इंडिया या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारतर्फे विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. भंडारा पंचायत समितीची या उपक्रमासाठी निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी विनयकुमार मून व गटविकास अधिकारी नूतन सावंत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
कोट
भंडारा पंचायत समिती यापुढेही उत्कृष्ट कार्य करणार
भंडारा पंचायत समितीने विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम केल्यामुळे ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमात केंद्र सरकारने निवड केल्याबद्दल अधिक प्रोत्साहन मिळाले आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित असून, अधिक चांगले काम करण्यासाठी ऊर्जा देणारी ही बाब आहे. भंडारा पंचायत समितीच्या या यशात सर्वांचा वाटा आहे. या निवडीबद्दल केंद्र सरकार व राज्य सरकारचे विशेष आभारी असल्याचे भंडारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नूतन सावंत सावंत यांनी सांगितले.