शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

ग्रामस्वराज अभियानासाठी सात गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:49 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २१ एप्रिलपर्यत ‘ग्रामस्वराज अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सात गावांची विशेष निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना प्राधान्याने आणि प्रकर्षाने राबविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देसबका साथ-सबका ग्राम-सबका विकास : २०१२ पर्यंत विविध योजना राबविणार

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २१ एप्रिलपर्यत ‘ग्रामस्वराज अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सात गावांची विशेष निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना प्राधान्याने आणि प्रकर्षाने राबविण्यात येणार आहेत.‘ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत या गावांमध्ये १४ ते २१ एप्रिल या सप्ताहादरम्यान 'सबका साथ सबका ग्राम सबका विकास' या धर्तीवर प्रधानमंत्री उज्वला योजना, सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य या योजनांची विशेष अंमलबजावणी कटाक्षाने राबविण्यात येणार आहे. याशिवाय या कालावधीत सामाजिक न्याय दिवस म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.त्याचबरोबर आयुष्यमान भारत दिवस, किसान कल्याण दिवस, अजीवीका दिवसही साजरे करण्यात येणार आहेत.याशिवाय स्वच्छ भारत दिवस, श्रमदान, शौचालय बांधणे व ते वापरणेबाबत जनजागृती रॅली, राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा करणे, विशेष ग्रामसभा आयोजित करणे, आरोग्य तपासणी, लसीकरण, स्त्री बळकटीकरण सामाजिक विकास आदी बाबतीचे चर्चासत्र आयोजित करणे बालपंचायत आयोजित करून त्यात रांगोळी, चित्रकला, हस्तकला, याबाबत निबंध वक्तृत्व स्पर्धा घेणे, शासकीय विषयांवरील चर्चासत्र व पथनाट्य आयोजित करणे त्याचबरोबर स्वयंसहायता महिला बचत गट, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य योजनेचे लाभार्थी, शासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, बँकर्स, सामाजिक संस्था, यांनाही सामावून घेवून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.निवड करण्यात आलेली गावे'ग्रामस्वराज अभियान' अंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सात गावांमध्ये अशोकनगर, सावरी, टेकेपार, गोलेवाडी, जांभळी, मासलमेटा, कान्हळगाव (सोमनाळा) गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये २१ एप्रिलपर्यत विविध योजना राबविणार येत आहेत.