लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकमतच्या संस्कार मोती स्पर्धा २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी तुमसर येथील श्रावी शिवशंकर बोरकर हिची निवड करण्यात आली आहे. ती तुमसर येथील शारदा विद्यालयाची विद्यार्थीनी आहे.शालेय विद्यार्थ्यांचे सुप्त गुण वाढावे, यासाठी लोकमत परिवाराच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याच अंतर्गत लोकमत संस्कार मोती २०१७-१८ मध्ये शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ही स्पर्धा १ जुलै ते १० आॅक्टोबर या १०० दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. यात सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना लोकमत परिवारातर्फे बक्षिस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले होते. याच स्पर्धेत जिल्हानिहाय एका विद्यार्थी स्पर्धकाची नागपूर-दिल्ली-नागपूर या हवाई सफरसाठी निवड करण्यात येणार होती.यात तुमसर येथील शारदा विद्यालयाची विद्यार्थीनी श्रावी बोरकर हिची निवड करण्यात आली आहे. ही हवाई सफर एक दिवसाची असून ती २६ जून २०१८ ला होणार आहे. या हवाई सफरसाठी श्रावी ही नागपूर येथून दिल्ली व परत नागपूरपर्यंत असा होणारा प्रवासाचा खर्च लोकमत परिवार उचलणार आहे. यात सदर विद्यार्थ्यांची चमू दिल्ली येथे महामहीम उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्याशी भेट घेऊन हितगुज साधणार आहे.
हवाई सफरसाठी श्रावी ची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:13 PM
लोकमतच्या संस्कार मोती स्पर्धा २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी तुमसर येथील श्रावी शिवशंकर बोरकर हिची निवड करण्यात आली आहे. ती तुमसर येथील शारदा विद्यालयाची विद्यार्थीनी आहे.
ठळक मुद्देशारदा विद्यालयाची विद्यार्थीनी : लोकमत संस्कार मोती स्पर्धा