लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात घटना या अधिक गतिमान झाल्या. त्यामुळे पोलीस खात्यावर मोठी जबाबदारी आली आहे. याकरिता शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनो तुम्ही वातावरणात वावरतांना वाईट प्रवृत्तीचा प्रतिकार करण्याची क्षमता तुम्हाला अवगत करणे वा शिक्षणासोबत आत्मसंरक्षण करणे काळची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा दामिनी पथक महिला पोलीस नायक सुनंदा खोब्रागडे यांनी प्रतिपादन केले.ओम सत्यसाई कला व विज्ञान महाविद्यालय परसोडी ठाणा येथील सभागृहात आत्मरक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना महिला पोलीस नायक बोलत होत्या.त्या म्हणाल्या की, शाळेत जाताना व येताना अनोळखी दुचाकी चारचाकी वाहनात प्रवास सहसा टाळावे. कधीही एकट्याने प्रवास वाहनातून करू नये, भ्रमणध्वनीद्वारे येणारी माहितीची शहानिशा करून पुढील पाऊल उचलावे, दुसरीकडून आलेले पोस्ट तिसऱ्याला चुकीने करू नये, त्या पोस्टची परिणती घातपाताची असल्यास दामिनी पथक व पोलिसांना कळवावे, रस्त्याने चालताना अघटीत घडले असल्यास त्याचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीकोणातून तुम्हाला आत्मसंरक्षणाचे धडे गिरविणे अगत्याचे आहे.मुलींची न विचारता फोटो काढणे, तिला पाहून शिटी वाजविणे, पतीने पत्नीला मारझोड करणे, शिव्या देणे, मुलाने मुलीला वारंवार फोन करणे, मुलीवर लैंगिक अत्याचार करणे कायद्याने गुन्हा ठरतो. परिणामी मुलीवर होणाºया अत्याचाराच्या कायद्याची माहिती अवगत करणे आजच्या विद्यार्थिनीला गरज आहे. संचालन व आभार प्रा.डॉ.वंदना मोटघरे यांनी केले.
आत्मसंरक्षण करणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:46 PM
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात घटना या अधिक गतिमान झाल्या. त्यामुळे पोलीस खात्यावर मोठी जबाबदारी आली आहे. याकरिता शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनो तुम्ही वातावरणात वावरतांना वाईट प्रवृत्तीचा प्रतिकार करण्याची क्षमता तुम्हाला अवगत करणे वा शिक्षणासोबत आत्मसंरक्षण करणे काळची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा दामिनी पथक महिला पोलीस नायक सुनंदा खोब्रागडे यांनी प्रतिपादन केले.
ठळक मुद्देसुनंदा खोब्रागडे : परसोडी ठाणा येथील ओम सत्यसाई महाविद्यालयात उपक्रम