नुकसान : हमीभावाला १५ मे चा मुहूर्तपालांदूर : लग्न सराईच्या धडाक्यात आर्थिक समस्या असल्याने उद्याचे अधिक पैशाच्या मोहात न पडता आणि दैनंदिन व्यवहाराकरीता नुकसानीचा विचार न करता शेतकरी १,२५० रूपये क्विटल दराने खाजगीत धान विकत आहे. शासनाच्या हमी भाव व बोनसच्या हिशेबाने ३६० रूपये प्रति क्विंटल नुकसान स्वीकारत आहे.शासन प्रशासन नियमावली करतो खरा पण वास्तविकतेचा विचार होत नसल्याने नियम बिनाकामाचे होत असून नियमाचा दुरउपयोग अधिक होताना दिसतो. पाण्याच्या दुर्भीक्षपणामुळे डिसेंबर जानेवारीतच रोवणी आटपून रबी धान एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात कापणीला येतो. ९० टक्के शेतकरी कापणी मळणी करून धान विक्रीला देत आहेत. हमी केंद्रावर व्यापाऱ्यांचा बोलबाला असल्याने साध्या भोळ्या शेतकऱ्याचा धान विकायला अनेक अडचणी येतात. मिळणारी रक्कम महिना भरातही मिळत नसल्याने व कापणी मळणीचा खर्च नगदी द्यावा लागत असल्याने कमी दरात विकावा लागत आहे. बारीक धान १,७०० रूपये तर १,५०० रूपयात विक्री जोमात सुरू आहे. शासनाने जर धान खरेदी एप्रिलपासून सुरू केले तर व्यापाऱ्यांना धान अत्यल्प मिळेल. हेकरणे शक्य आहे. परंतू शासन प्रशासन, लोकप्रतिनिधी लक्ष का देत नाही हे समजायला मार्ग नाही. हल्ली हवामान रब्बीधान शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसले आहे. वादळ वारा, पाऊस, गारपीट यामुळे हातात आलेले पिक वाया जाण्याच्या भितीने कापणी मळणी झटपट आटपत धान विक्रीकरीता उपलब्ध आहे. पावसाळा लवकर येण्याच्याही संकेताने शेतकरी सतर्क झाला असून खरीबाच्या तयारीकरीता धान साठवून न ठेवता विकत आहे. (वार्ताहर)धान खरेदीचे पत्र मिळाले नाही परंतू भ्रमणध्वनीवरून १५ मे ला धान खरेदी सुरू करणार असल्याचे डीएमओ कार्यालयातून समजले. खरीपाच्या धानाची उचल सुरू असून शिल्लक साठा क्विंटल आहे.- बालू खंडाईत, ग्रेडर धान खरेदी केंद्र पालांदूर.शासनाच्या हमी भाव केंद्रावर आम्हा शेतकऱ्यांचा धान मोजायला मुद्यामधून विलंब केला जातो. आर्थिक लालसेपोटी कोणतेही कारण पुढे करीत व्यवसायाचा धान आधी मोजला जातो. हमी भाव धान केंद्र सुरू झाला वेळ असल्याने व उधारीवर व्यवहार असल्याने आमचे व्यवहार अडतात. हल्ली इकडे आणणे व तिकडे देणे असल्याने उधारीवर धान विकू शकत नाही. - देविदास कोरे,धान उत्पादक बारमाही शेतकरी पाथरी.
धानाची कवडीमोल दरात विक्री
By admin | Published: May 08, 2016 12:32 AM