भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्निकांडात अकरा चिमुकल्यांचा बळी गेला. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांपासून डझनभर मंत्र्यांनी भेटी दिल्या. दाेषींना साेडणार नाही, अशी भीमगर्जना करण्यात आली. आता तब्बल ४० दिवसानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. मात्र कनिष्ठा कर्मचाऱ्यांवर गुन्हे नाेंदवून वरिष्ठांना पाठीशी तर घातले नाही जात नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. दाेन अधिपरिचारिकांवर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास या प्रकरणात गुन्हे नाेंदविण्यात आलेत.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता वाॅर्डातील आऊटबाॅर्न युनिटमध्ये ९ जानेवारीच्या पहाटे भीषण अग्निकांड झाले. दहा बालकांचा जागीच मृत्यू झाला तर महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर एका बालकाचा मृत्यू झाला. आता मृतांची संख्या ११ झाली आहे. ही घटना घडली तेव्हा संपूर्ण देश हळहळला. दाेषींविरुध्द प्रचंड राेष व्यक्त करण्यात आला. परंतु नेमके दाेषी काेण? हे कळायला मार्ग नव्हता. यासाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चाैकशी समितीचे गठण केले. येथे भेट देणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील दाेषींना साेडणार नाही, अशी ग्वाही दिली. प्रकरणाचा तपास सुरु झाला. दरम्यान, शासनाने २१ जानेवारी राेजी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रमाेद खंडाते, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अर्चना मेश्राम आणि अधिपरिसेविका ज्याेती बारस्कर यांना निलंबित केले. बालराेगतज्ज्ञ सुशील अंबादे आणि कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलढुके, शुभांगी साठवणे यांची शासनाने सेवा समाप्त केली तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुनीता बढे यांचे स्थानांतरण करण्यात आले.
या प्रकरणात सुरुवातीला केवळ आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली हाेती. पाेलिसांनी तपास सुरु केला. परंतु कुणीही याप्रकरणी रितसर ठाण्यात तक्रार दिली नव्हती. मृत्युमुखी पडलेल्या बालकाच्या कुण्याही नातेवाईकाने पुढाकार घेत याप्रकरणी पाेलिसात धाव घेतली नाही. तर दुसरीकडे काेणतीच तक्रार ठाण्यात दाखल नव्हती.
याप्रकरणात असलेल्या दाेषींवर कडक कारवाई हाेईल, अशी अपेक्षा हाेती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्मिता संजय आंबिलढुके आणि शुभांगी यादाेराव साठवणे या दाेन अधिपरिचारिकांवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा नाेंदविण्यात आला. रुगणालयातील वरिष्ठ अधिकारी व डाॅक्टर मात्र नामानिराळे असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात नेमके काेण दाेषी आहेत. त्या सर्व दाेषींवर कारवाई करण्याची गरज आहे. परंतु कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा बळी देऊन वरिष्ठ नामानिराळे राहणार तर नाही ना? अशी शंका येथे उपस्थित हाेत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्निकांडात अकरा चिमुकल्यांचा बळी गेला. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांपासून डझनभर मंत्र्यांनी भेटी दिल्या. दाेषींना साेडणार नाही, अशी भीमगर्जना करण्यात आली. आता तब्बल ४० दिवसानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. मात्र कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर गुन्हे नाेंदवून वरिष्ठांना पाठीशी तर घातले नाही जात नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. दाेन अधिपरिचारीकांवर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास या प्रकरणात गुन्हे नाेंदविण्यात आलेत.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता वाॅर्डातील आऊटबाॅर्न युनिटमध्ये ९ जानेवारीच्या पहाटे भीषण अग्निकांड झाले. दहा बालकांचा जागीच मृत्यू झाला तर महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर एका बालकाचा मृत्यू झाला. आता मृतांची संख्या ११ झाली आहे. ही घटना घडली तेव्हा संपूर्ण देश हळहळला. दाेषींविरुध्द प्रचंड राेष व्यक्त करण्यात आला. परंतु नेमके दाेषी काेण, हे कळायला मार्ग नव्हता. यासाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चाैकशी समितीचे गठण केले. येथे भेट देणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील दाेषींना साेडणार नाही, अशी ग्वाही दिली. प्रकरणाचा तपास सुरु झाला. दरम्यान, शासनाने २१ जानेवारी राेजी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रमाेद खंडाते, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अर्चना मेश्राम आणि अधिपरिसेविका ज्याेती बारस्कर यांना निलंबित केले. बालराेगतज्ज्ञ सुशील अंबादे आणि कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलढुके, शुभांगी साठवणे यांची शासनाने सेवा समाप्त केली तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुनीता बढे यांचे स्थानांतरण करण्यात आले.
या प्रकरणात सुरुवातीला केवळ आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली हाेती. पाेलिसांनी तपास सुरु केला. परंतु कुणीही याप्रकरणी रीतसर ठाण्यात तक्रार दिली नव्हती. मृत्युमुखी पडलेल्या बालकाच्या कुण्याही नातेवाईकाने पुढाकार घेत याप्रकरणी पाेलिसात धाव घेतली नाही. तर दुसरीकडे काेणतीच तक्रार ठाण्यात दाखल नव्हती.
याप्रकरणात असलेल्या दाेषींवर कडक कारवाई हाेईल, अशी अपेक्षा हाेती. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्मिता संजय आंबिलढुके आणि शुभांगी यादाेराव साठवणे या दाेन अधिपरिचारिकांवर सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा नाेंदविण्यात आला. रुगणालयातील वरिष्ठ अधिकारी व डाॅक्टर मात्र नामानिराळे असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात नेमके काेण दाेषी आहेत. त्या सर्व दाेषींवर कारवाई करण्याची गरज आहे. परंतु कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा बळी देवून वरिष्ठ नामानिराळे राहणार तर नाही ना? अशी शंका येथे उपस्थित हाेत आहे.
तक्रार देण्यासाठी लागले चाळीस दिवस
n जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडानंतर गुरुवारी रात्री म्हणजे तब्बल चाळीस दिवसानंतर या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली. साकाेलीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी अरुण वायकर यांनी या प्रकरणाची चाैकशी करुन तक्रार दाखल केली. भंडारा पाेलीस ठाण्यात भादंवि ३०४ (पार्ट २) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणाचा तपास भंडाऱ्याचे उपविभागीय पाेलीस अधिकारी संजय पाटील करीत आहे. देश हादरवून टाकणाऱ्या घटनेत एफआयआर दाखल करण्यास तब्बल चाळीस दिवस लागल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे. त्यातही केवळ दाेन परिचारिकांवरच गुन्हा नाेंदविल्याने इतरांचे काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. या प्रकरणाला दाेषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई करावी. न्याय वैद्यक अहवालावरुन जे पुढे येईल त्यानुसार याेग्य कारवाई व्हावी एवढी सर्वांची अपेक्षा आहे.तक्रार देण्यासाठी लागले चाळीस दिवस
n जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांडानंतर गुरुवारी रात्री म्हणजे तब्बल चाळीस दिवसानंतर या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली. साकाेलीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी अरुण वायकर यांनी या प्रकरणाची चाैकशी करुन तक्रार दाखल केली. भंडारा पाेलीस ठाण्यात भादंवि ३०४ (पार्ट २) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणाचा तपास भंडाराचे उपविभागीय पाेलीस अधिकारी संजय पाटील करीत आहे. देश हादरुन टाकणाऱ्या घटनेत एफआयआर दाखल करण्यास तब्बल चाळीस दिवस लागल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे. त्यातही केवळ दाेन परिचारिकांवरच गुन्हा नाेंदविल्याने इतरांचे काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. या प्रकरणाला दाेषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई करावी. न्याय वैद्यक अहवालावरुन जे पुढे येईल त्यानुसार याेग्य कारवाई व्हावी एवढी सर्वांची अपेक्षा आहे.