भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथील सिरसी येथील अंजु पिपरेवार यांच्या राहत्या घरी व्यंजन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.प्रशिक्षिका चित्रा झुरमुरे यांनी सखींना नानखटाई व भाकरवडी प्रात्याक्षकरित्या करून शिकविली व घरगुती महत्वाच्या टिप्स देखील दिल्या. कार्यक्रमाचे संचालन विभाग प्रतिनिधी अंजु पिपरेवार तर आभत्तर विजयालक्ष्मी वैद्य यांनी मानले. जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. (मंच प्रतिनिधी)
सिरसीत व्यंजन प्रशिक्षण उत्साहात
By admin | Published: December 24, 2015 12:42 AM