आॅनलाईन लोकमतसाकोली : तालुका विधी सेवा समिती, साकोलीच्या वतीने दिवाणी न्यायालय, क स्तर साकोली येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले. एकूण १४४२ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून ४३,६५,६८९ रूपयांची राष्ट्रीय लोकअदालतीतून दंड रूपाने वसुली करण्यात आली.यात २५३ प्रलंबित प्रकरणापैकी १४६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून त्यात मुख्यत्वे ५ वर्षापेक्षा जास्त जुने ५ दिवाणी प्रकरणे निकाली काढण्यात आले. प्रलंबित प्रकरणातून ७७ हजार रूपयांची वसुली करण्यात आली. पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये बँकेची ५०७ प्रकरणापैकी १५ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून २३,५१, ७३५ रूपयांची वसुली करण्यात आली. ४१ ग्रामपंचायतीच्या ३९५३ प्रकरणापैकी ११८४ प्रकरणातून १६,३१,८१२ रूपयांची वसुली करण्यात आली. नगर परिषदेच्या १८७ प्रकरणापैकी ६५ प्रकरणातून २,००,९४२ रूपयांची वसुली करण्यात आली.महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या १६ प्रकरणापैकी ४ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून ६३,११० रूपयांची वसुली करण्यात आली.बीएसएनएलच्या २४८ प्रकरणापैकी २६ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून २३,५०० रूपयांची वसुली करण्यात आली तर तहसिल कार्यालयाच्या ५५ प्रकरणापैकी २ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून १७,५९० रूपयाची वसुली करण्यात आली.एकूण १,४४२ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून ४३,६५,६८९ रूपयांची राष्ट्रीय लोकअदालतीतून दंड रूपाने वसुली करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतच्या पॅनेलवर न्यायाधीश एन.के. वाळके, अॅड. पी.डब्ल्यु. खोब्रागडे, पी.एल.व्ही.जे.टी. रामटेके यांनी काम पाहिले तर तालुका वकील संघाचे अधिवक्ता, पोलीस कर्मचारी, तहसिल कार्यालयाचे कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, बँकेचे कर्मचारी, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे, नगर परिषदेचे कर्मचारी, बीएसएनएलचे कर्मचारी तसेच न्यायालयीनकर्मचारी बी.डी. कुलरकर, जी.के. उपासे, मानकर, व्ही.एस. भेदे, एस.एस. शामकुवर, आर.एस. खेताडे, एस.एन. मुंगुलमारे, एन.जी. रहांगडाले, पी.सी. मेश्राम, डी.के. गौर, आर.पी. वाघमारे यांनी सहकार्य केले.
लोक अदालतीत १,४४२ प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:07 PM
तालुका विधी सेवा समिती, साकोलीच्या वतीने दिवाणी न्यायालय, क स्तर साकोली येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले.
ठळक मुद्देसाकोली येथे आयोजन : ४३ लाखांची वसुली