लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा): करडी प्राथमिक आरोग्य केंद्राची ३५ वर्ष जुनी मुख्य इमारत व निवासस्थानांच्या नवनिर्माणासाठी सुमारे सात कोटी रुपयांच्या निधीस जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे. जिर्ण बांधकामाच्या निर्लेखनास जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिल्यानंतर प्रस्ताव राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. आवश्यक सर्व प्रक्रिया होवून लवकरच बांधकामास प्रारंभ केला जाणार आहे.करडी परिसरातील २५ गावातील सुमारे ४५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी करडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती ३५ वर्षापुर्वी करण्यात आली. वयोमानानुसार आरोग्य केंद्राची इमारत जिर्ण झालेली असल्याने ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत.पावसाळयात पाणी गळती असल्याने रुग्ण व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना असुविधांचा सामना करावा लागतो. निवासस्थानांचे सुध्दा बेहाल असून कर्मचारी इमारतीत राहण्यासाठीे धजावत नाहीत. धोकादायक मुख्य इमारत व निवासस्थाने असल्याने बांधकामाचे निर्लेखन करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य निलिमा इलमे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा केली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घ्यावयांच्या कामांच्या सुधारणांसह प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व निवासस्थान इमारत निर्लेखन व बांधकाम पुर्नबांधणीस मंजूरी देण्यात दिली.सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा आरोग्य विभागाकडे सदर इमारती निर्लेखीत झाली असल्याचा (अनुपालन) अहवाल सादर करण्यासाठी लेखी पत्र दिले होते. दोन्ही विभागाने निर्लेखन व नवनिर्माणासाठी हरकत नसल्याचे कळविल्याने बांधकामाच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे बांधकामासंबंधाने सुमारे सात कोटी रुपयांचा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळण्याची अपेक्षा असून त्यानंतर बांधकामास प्रारंभ केला जाणार आहे.करडी प्राथमिक आरोग्य केंद्राची ३५ वर्ष जुनी इमारत व कर्मचारी निवासस्थान वापरण्यायोग्य नाही. आरोग्य विभाग व बांधकाम विभागाकडून निर्लेखनाची कार्यवाही करण्यात आलेली आहे. बांधकामास जिल्हा परिषदेकडून सुमारे सात कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजूरी मिळण्याची खात्री असून त्यानंतर बांधकामास प्रारंभ कलो जाईल.-निलीमा इलमे, जि.प. सदस्या, करडी.
सात कोटींचा निधी प्रस्तावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:42 AM
करडी प्राथमिक आरोग्य केंद्राची ३५ वर्ष जुनी मुख्य इमारत व निवासस्थानांच्या नवनिर्माणासाठी सुमारे सात कोटी रुपयांच्या निधीस जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे. जिर्ण बांधकामाच्या निर्लेखनास जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिल्यानंतर प्रस्ताव राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे.
ठळक मुद्देकरडी प्राथमिक आरोग्य केंद्र : जीर्ण मुख्य इमारत व वसाहतींच्या निर्लेखनास मंजुरी