आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयुष मंत्रालयाने ठरवून दिलेल्या सामान्य योग प्रोटोकॉलप्रमाणे १९ व २० जूनला सकाळी ५.४५ ते ७ या वेळेत योग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. योगाभ्यासाचे आयोजन ऑनलाइन करण्यात आले. डॉ. विकास ढोमणे, प्राचार्य जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योग प्रशिक्षक कांचन ठाकरे व डॉ. रमेश खोब्रागडे, जिल्हा प्रभारी, भारत स्वाभिमान न्यास भंडारा यांनी सर्व सहभागी व्यक्ती तथा विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे प्रशिक्षण दिले. हितेंद्र वैद्य जिल्हा समन्वयक, श्री रमेश अहिरकर,नेहरू युवा केंद्र भंडारा यांनी सर्व योग प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लाभ महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थ्यांनी, पतंजली परिवारातील सदस्य व सामान्य लोकांनी आभासी पद्धतीने घेतला.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. भीमराव पवार, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. कार्तिक पनिकर, समन्वयक अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष, प्रा. भोजराज श्रीरामे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. जितेंद्र किरसान, एनसीसी अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व एनसीसीचे कॅडेट्स यांनी मोलाचे योगदान दिले.