लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारावासीयांची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीवर ईकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला असून सद्यस्थितीत वैनगंगेला हिरव्या लॉनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या वैनगंगेच्या पाण्यावर ईकॉर्निया जलपर्णी वनस्पती पसरली असून यामुळेही पाणी दूषित होत आहे.कारधा येथील या नदीला ईकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने पूर्णपणे आच्छादून टाकले आहे. दोन वर्षांपूर्वी या वनस्पती निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु तिला पूर्णपणे यश आले नाही. पाहतापाहता या वनस्पतीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ही वनस्पती विषयुक्त नसली तरी या वनस्पतीमुळे नदीपात्रातील जलचर प्राण्यांना त्याचा फटका बसत आहे. याशिवाय ज्याठिकाणी पाणी संथगतीने वाहते किंवा पाण्याचा प्रवाह थांबलेला आहे, अशा ठिकाणी ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या वनस्पतीमुळे पाण्याचे बाष्पीकरण होण्याचे प्रमाण वाढते. विशेषत: तलावात ही वनस्पती आढळते.गोसेखुर्द धरणामुळे वैनगंगेचे पाणी अडविण्यात आले. त्यात नाग नदीच्या दूषित पाण्यामुळे या नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात मानवी आरोग्याला धोका होण्याची शक्यता बळावली आहे.नदीपात्रात या वनस्पतीने शिरकाव केल्यामुळे ही वनस्पती समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी तथा सामान्य नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी निर्मल व पवित्र वैनगंगा नदी असून या वैनगंगेच्या काठी अनेक धार्मिक स्थळे, शहर व गावे वसलेले आहे. प्राचीन काळापासून त्याचे पवित्र व शुद्ध जल पिऊन लोक तृप्त होत असतात.गोसे धरणातील जलसाठाने ३० ते ३५ किमी भंडारा कारधापर्यंत नदी दुथडी पाण्याने भरली आहे. मात्र नागपूर येथील घरातील सांडपाणी, गटारव्दारे निचरा होणारे अत्यंत दुषित व विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज विषयुक्त पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगा नदीच्या प्रवाहात मिसळल्याने वैनगंगा नदीचा पाणी दुषित, दुर्गंर्धीयुक्त, हिरवट व काळसर झाला आहे. शहर व नदीकिनाऱ्यालगत असणाºया अनेक गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. पाणी पिण्यायोग्य नसल्याने जनावरे सुद्धा पाणी पिवुन मृत्युच्या दाढेत जात आहेत. तर मासोळयांचे जीवन संपुष्टात आले आहेत. दुषित पाण्यामुळे नागरिकांना कावीळ, डायरीया, हागवण यासारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहेत. नदीशुध्दीकरणाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.स्लो पॉयझन नागरिकांच्या जीवितास धोकाजिल्ह्यातील अनेक गावातील लोकांना अशुद्ध दुषीत पिण्याचे पाणी पुरविले जात आहेत. परिणामत: या दुषित पाणी व स्लो पॉयझनमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. वैनगंगेत येणारे नागनदीचे दुषीत पाणी त्वरीत रोखुन नंतर जलशुद्धीकरण यंत्राने शुद्ध करून वैनगंगा नदीत सोडावे व वैनगंगा या पाण्याने दुषीत झालेली असल्याने या नदीच्याही शुद्धीकरणाकरिता गंभीरतेने शासनस्तरावर योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी भंडारावासीयांनी केली आहे.
वैनगंगेला आले हिरव्या लॉनचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 1:03 AM
भंडारावासीयांची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीवर ईकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला असून सद्यस्थितीत वैनगंगेला हिरव्या लॉनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या वैनगंगेच्या पाण्यावर ईकॉर्निया जलपर्णी वनस्पती पसरली असून यामुळेही पाणी दूषित होत आहे.
ठळक मुद्देनदी शुद्धीकरणाचा फज्जा। ईकॉर्नियाच्या विळख्याने पाणी झाले दूषित