भंडारा : क्रांती दिनाचे औचित्य साधून भंडारा युवक बिरादरीने प्रतिवर्षांप्रमाणे याही वर्षी क्रांतीस्वर समूह गीत स्पर्धेचे आयोजन केलेले होते. कोरोनाचा काळ असल्याने ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली होती. या स्पर्धेत स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या चमूस प्रथम पारितोषिक मिळाले.
क्रांती दिनाला हुतात्मा स्मारकात झालेल्या कार्यक्रमात भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
'‘पुन्हा नव्याने, नव्या दिलाने गाणे गाऊ या ' या आशुतोष जावडेकर यांच्या गीताचे गायन विद्यार्थ्यांनी केले. संगीत संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख स्मिता गालफाडे यांनी केले होते. इयत्ता नववी ते बारावीतल्या विद्यार्थ्यांचा या समूह गीतात सहभाग होता. साक्षी चवरे,नेहा रंगारी, माही रंगारी, सुहानी कहालकर, कांचन कहालकर, सुहानी वालोदे, अंशदा हेडाऊ या विद्यार्थिनी तर वादक म्हणून सिंथेसायजर वादक वेदांत बारसकर, अंशिका झुरमुरे, प्रणय बानेवार या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल प्राचार्या केशर बोकडे यांनी विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे कौतुक केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षिका वीणा सिंगणजुडे, सांस्कृतिक उपप्रमुख वैशाली तुमाने यांनी प्रयत्न केले. शाळेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या स्पर्धेचा निकालही आभासी कार्यक्रमात घोषित झाला हे विशेष. युवक बिरादरीच्या संचालक वर्षा दाढी, विक्रम फडके, गौरी दाढी, प्रणित उके, वैभव कोलते, समन्वयक सुरेंद्र कुलरकर यांनी चमूचे कौतुक केले.