आता प्रतीक्षा अहवालाची : प्रकरण बयाण गोपनियता भंगचे भंडारा : पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणी समितीने घेतलेल्या चौकशीदरम्यान अनुपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने खंडविकास अधिकारी यांच्या कार्यालयात लिफाफाबंद बयान दिले होते. मात्र त्या कर्मचाऱ्याला पुन्हा एकदा बयाण द्यावे लागले. वस्तुत: कर्मचाऱ्याचे सादर केलेले बयानच कार्यालयातून गहाळ झाल्याने बीडीओंनी त्याला पुन्हा बयाण सादर करण्याची सूचना दिली होती. कर्मचाऱ्यांच्या बयाण नोंदणीनंतर आता तमाम आरोग्य विभागाचे लक्ष जि.प.च्या सर्वसाधारण सभेकडे लागले आहे. याच धर्तीवर समिती आपला अहवाल येत्या काही दिवसात सादर करण्याची शक्यता आहे. यात मोठे मासे गळाला लागण्याची आरोग्य विभागात चर्चा रंगू लागली आहे. या प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी जिल्हा आरोग्य समितीने पाच सदस्यीय चौकशी समिती गठित केलीबिडीओंच्या सुचनेनंतर दिले बयाणभंडारा : चौकशी समितीने ६ जून रोजी कर्मचाऱ्यांचे लेखी स्वरुपात बयान घेतले. मात्र यावेळी पाचपैकी तीन कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविता आले नव्हते. यासंबंधाने त्यांचे बयाण भंडारा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्याची सुचना करण्यात आली होती. यात एका कर्मचाऱ्याचा अहवाल पंचायत समितीकडे पाठविल्यावर ते बयाण तिथून गहाळ झाले. याची माहिती संबंधित कर्मचाऱ्याला देण्यात आल्यानंतर त्यांनी आपले बयाण पुन्हा लिहून रितसरपणे बीडीओंकडे सादर केले आहे. विशेष म्हणजे बयाण गहाळ होणे गंभीर बाब असली तरी बीडीओंच्या समय सुचकतेमुळे त्या कर्मचाऱ्याचे बयाण पुन्हा घेण्यात आले. बयाण भंग प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यावर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरण मोठे नाही, क्षुल्लक आहे, असे वरिष्ठांकडून बतावणी करून दोषी अधिकाऱ्यांवरील कारवाई कशी टाळता येईल, याचाही पुरजोर प्रयत्न सुरू आहे. याप्रकरणात एका-एका कर्मचाऱ्यांचे बयाण महत्वपूर्ण ठरणार आहे. अहवाल सर्वसाधारण सभेत सादर होणार की काय? याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)
‘त्या’ कर्मचाऱ्याला द्यावे लागले पुन्हा बयाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2016 12:37 AM