लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बांधकाम साहित्याचे कीट घेण्यासाठी तीन दिवसांपासून पावसात तिष्ठत असलेल्या कामगारांकरिता शिवसैनिकांनी सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना येथे गुरुवारी (दि. ४) रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली.जिल्हा कामगार कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कामगारांना बांधकाम साहित्याचे कीट वाटपाचे काम सुरू आहे. त्यासाठी शेकडो कामगार येथे उपस्थित झाले आहेत. किट वाटपाचे काम संथगतीने सुरू असल्याकारणाने कामगारांना विलंब होतो आहे. तशाच पावसाने हजेरी लावल्यामुळे या कामगारांची मोठी गैरसोय झाली आहे. या सर्व मुद्यांकरिता शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोेंडेकर यांनी अन्य शिवसैनिकांसह गुरुवारी सकाळी आयुक्त कार्यालयावर हल्ला चढवला. तेथील आयुक्तांच्या कक्षाची तोडफोड केली. काचा फोडल्या व विरोधी घोषणा दिल्या.
भंडारा जिल्हा कामगार कार्यालयात शिवसेनेची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 2:22 PM
बांधकाम साहित्याचे कीट घेण्यासाठी तीन दिवसांपासून पावसात तिष्ठत असलेल्या कामगारांकरिता शिवसैनिकांनी सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना येथे गुरुवारी (दि. ४) रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली.
ठळक मुद्देशेकडो कामगारांची गर्दी