बॉक्स
त्या शिवभोजन थाळीची चवच न्यारी...
राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीत दोन चपात्या, एक भाजी, भात, आमटी असे पोटभर जेवण दिले जाते. भंडारा शहरातील जिल्हा परिषद कँटीनमधील शिवभोजन थाळीची चवच न्यारी असल्याचे येथील आलेल्या ग्राहकांनी सांगितले. याशिवाय येथे कोरोना नियमांचे पालन व स्वच्छता राहत असल्याने माविम संचलित केंद्रांतर्गत कार्यरत शिवभोजन केंद्राकडे अनेकांचा ओढा आहे. केंद्रचालकांना सरकारतर्फे अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. १४ एप्रिलपासून राज्य शासनाने मोफत शिवभोजन थाळी देण्यास सुरुवात केली आहे. १५ जुलैपर्यंत मोफत थाळी दिली होती.
कोट
शिवभोजन थाळीचा अनेक गरीब गरजू लोकांना लाभ मिळत असून, त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. कोरोना नियमांच्या पालनात एकावेळी दहा जणांच्या जेवणाची व्यवस्था केली असल्याने शासकीय कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेकांना शिवभोजन थाळीचा लाभ दिला जात आहे.
रंजना खोब्रागडे, व्यवस्थापक, नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र, भंडारा