शिवरायांचा जयजयकार : मान्यवरांचे मार्गदर्शन, गुणवंतांचा सत्कारभंडारा : युथ फॉर नेशनच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन शुक्रवारला शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय एकापूरे होते. पाहुणे म्हणून प्रांत धर्मजागरण विभाग प्रमुख अशोक घाडगे, राहूल चव्हाण, चंद्रकांत शेष उपस्थित होते. प्रारंभी शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिषेक करून पूजन करण्यात आले. शिवा चेपे यांनी पौरोहित्य केले. यावेळी डॉ.एकापूरे म्हणाले, शिवाजी महाराजांचे कर्तृत्व महान आहे. त्यांनी धमार्साठी जे केले, त्या तुलनेत आपण थोडेही करू शकलो तरी स्वत:ला भाग्यवान म्हटले पाहिजे. शिवाजींच्या मावळ्यांसारखे कणखर होऊन धर्मजागरण, समरसता आणि देशभक्तीची आव्हाने पेलण्यासाठी तयार व्हा, असे आवाहन केले. अशोक घाडगे म्हणाले, शिवरायांचा अभ्यास करून तो आत्मसात करावा व तसे वागावे हीच काळाची गरज आहे. या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत हर्षदा परमारे तर बारावीच्या परीक्षेत ॠचिता ढवळे, पदवाड, वैशाली राघोर्ते यांना गौरविण्यात आले. त्यानंतर असर फाऊंडेशनचे विक्रम फडके यांनी शिवाजी महाराजांची आरती गायली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युथ फॉर नेशनचे संयोजक उमेश निपाने, सहसंयोजक संदीप पराते, मोहित वडदकर, भरत कटारे, प्रविण दुरुगकर, राहूल जीवतोडे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
युथ फॉर नेशनतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा
By admin | Published: June 19, 2016 12:24 AM