शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:21 PM

धान खरेदी केंद्र सुरु करा व शेतीच्या पंचनाम्याच्या आधारावर नुकसान भरपाई द्यावी या मागणीला घेऊन शिवसेनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देशासन व प्रशासनाविरूद्ध जोरदार घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान खरेदी केंद्र सुरु करा व शेतीच्या पंचनाम्याच्या आधारावर नुकसान भरपाई द्यावी या मागणीला घेऊन शिवसेनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.धान उत्पादक जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात दरवर्षी दिवाळीपूर्वी शेतकºयांचे धान शासनाने ठरवून दिलेल्या किमतीनुसार विकत घ्यावे यासाठी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. मात्र आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु न झाल्याने, धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.जिल्ह्यातील शेतकºयांची स्थिती पाहता या हंगामात दिवाळीपूर्वी आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करणे आवश्यक होते. मात्र दिवाळी होऊनही आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु न झाल्यामुळे शेतकºयांना मिळेल त्या दराने धान खाजगी व्यापाºयाला व कृषी उत्पन्न बाजार समितीत नेऊन विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी करण्यात आली.मोर्चानंतर निवेदन स्वीकारण्या साठी जिल्हाधिकाºयांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलक माघारी परतले. त्यानंतर संतप्त शिवसैनिक प्रशासनाविरूद्ध घोषणा देत तेथून परतले. या बैलबंडी मोर्चात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.