लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील लाखनी पोलिस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन विधीसंघर्षित बालिकेने मोबाइलच्या वादातून आपल्या स्वत:च्या घरच्या लोकांच्या जेवणात विष टाकल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान घडली. यात त्या बालिकेच्या बहिणीने ते विषयुक्त अन्न खाल्याने गंभीर झाली असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.या प्रकरणाने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन ती विधीसंघर्षित बालिका शहरातील एका शाळेत ९ व्या वर्गात शिक्षण घेत असुन तिच्याजवळ मोबाईल कुठून आला याविषयी घरच्या मंडळींनी विचारणा केली असता त्या बालिकेने मोबाइलच्या कारणावरून घरच्या लोकांसोबत भांडण केले. तसेच सायंकाळी घरी तयार केलेल्या अन्नात विष टाकले. त्यावेळी घरची मंडळी घरच्या स्लॅबवर फिरत होती. घरी आल्यावर स्वयंपाक खोलीत विषाचा दुर्गंध यायला लागला. त्याकडे त्या विधीसंघार्षित बालिकेच्या बहिणीने दुर्लक्ष केले व तिने ते अन्न सेवन केले. मात्र वडिलांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तिला तात्काळ लाखनी ग्रामीण रुग्णालयात भरती केले. सध्या ती बालिका भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असुन ती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी संगितले.या प्रकरणी विधीसंघर्षित बलिकेच्या वडिलांच्या तक्रारी वरुण लाखनी पोलिसांनी अप. क्र. १३६/२०२० कलम ३०७,३२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा तपास पोलिस निरीक्षक मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर व पोलिस शिपाई मुकेश गायधणे करीत आहेत.
धक्कादायक! मोबाईलच्या वादात बालिकेने टाकले जेवणात विष; भंडारा जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 4:13 PM
भंडारा तालुक्यातील लाखनी पोलिस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन विधीसंघर्षित बालिकेने मोबाइलच्या वादातून आपल्या स्वत:च्या घरच्या लोकांच्या जेवणात विष टाकल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान घडली.
ठळक मुद्देलाखनी येथील घटना