शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

दुकाने होणार आता रात्री सात वाजताच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:34 AM

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आता सर्व दुकाने रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आता सर्व दुकाने रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी शुक्रवारी (दि. १९) काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी मंगळवारी (दि. २३) रात्री १२ वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाने कहर केला असतानाच आता जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव बघता वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांची गर्दी होऊ न देणे हे गरजेचे झाले आहे.

अशात जिल्हाधिकारी मीना यांनी सर्व आस्थापना, व्यवसाय व दुकानांना रात्री आठ वाजता बंद करण्याचे आदेश काढले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी मंगळवारी (दि. २३) रात्री १२ वाजल्यापासून करावयाची असून, उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार कारवाई केली जाणार आहे.

यांना वगळण्यात आले

या आदेशातून सर्व रुग्णालये, औषधविक्री दुकाने व वैद्यकीय सेवेशी संबंधित आस्थापना, तसेच पेट्रोलपंप, दूध व दुग्धजन्य पदार्थ संकलन व विक्री केंद्र, औषधांची घरपोच सेवा करणाऱ्या आस्थापनांना वगळण्यात आले आहे. तसेच खाद्यपदार्थांची घरपोच सेवा रात्री १० वाजण्यापर्यंत उपलब्ध राहणार असून, हॉटेल-रेस्टॉरंटचे फक्त स्वयंपाकगृह रात्री १० वाजण्यापर्यंत सुरू ठेवता येणार आहे.