लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्याला कधी विमानात बसायला भेटेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धेमुळे स्वप्नवत वाटणारा विमान प्रवास आपण करु शकलो. ही माझासाठी आयुष्यभर संस्मरणीय घटना आहे, असे नागपूर ते दिल्ली हवाईसफर करुन परत आलेली खरबी येथील विद्यार्थीनी श्रध्दा सुरेश जौंजाळ सांगत होती.लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेंतर्गत भंडारा तालुक्यातील खरबीनाका येथील विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी श्रध्दा जौंजाळ हिची नागपूर - दिल्ली हवाईसफरसाठी निवड झाली. हा प्रवास करुन ती खरबी येथे पोहोचली. लोकमत भंडारा जिल्हा कार्यालयाच्या वतीने तिचा शाळेत सत्कार करण्यात आला. त्यावेळी ती बोलत होती. स्वप्नवत वाटणारे हवाई सफर केवळ ‘लोकमत’मुळेच आपल्याला करता आली. तिने दिल्लीच्या हवाई सफरीचे वर्णन कथन केले.ती म्हणाली, आपली हवाईसफर साठी निवड झाली यावर विश्वास बसत नव्हता. पहिल्यांदाच नागपूरचे विमानतळ बघितले. मनात धाकधुक होती. परंतु सोबत असलेल्या इतर मित्रांमुळे काहीही वाटले नाही. दीड तासाचा विमान प्रवास करुन आम्ही दिल्लीत पोहोचलो. तेथे इंडिया गेट, इंदिरा गांधी स्मृती भवन, रेल्वे वस्तु संग्रहालय बघीतले. तसेच बाहेरुन राष्टÑपती भवन, संसद भवनही बघता आले.केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोतरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पा मारता आल्या.लोकमतच्या या उपक्रमामुळे महाराष्टÑातील विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये भेटून मोठा आनंद झाल्याचे नितीन गडकरी म्हणाल्याचे श्रध्दाने यावेळी सांगितले. संसदेच्या व्यस्ततेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होऊ शकली नाही. परंतु त्यांना अगदी जवळून जाताना व हात उंचावून अभिवादन करताना बघून आम्ही भारावून गेलो, अशी ती म्हणाली. पुन्हा दीड तासांचा प्रवास करुन आम्ही नागपुरात पोहोचलो.लोकमततर्फे सत्कारहवाई सफर केल्याबद्दल श्रध्दाचा लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमतचे शाखा व्यवस्थापन मोहन धवड यांनी तिचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी शाळेचे अध्यक्ष उद्दल आकरे, सचिव डॉ. श्रीहरी जौंजाळ, मुख्याध्यापक वसंत कारेमोरे, लोकमतचे वितरण अधिकारी विजय बन्सोड, जाहिरात प्रतिनिधी विनोद भगत आणि खरबीनाकाचे वार्ताहर पुंडलिक हिवसे उपस्थित होते.
श्रद्धा म्हणते, विमानातून प्रवासाचे स्वप्नही बघितले नव्हते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:22 PM
आपल्याला कधी विमानात बसायला भेटेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धेमुळे स्वप्नवत वाटणारा विमान प्रवास आपण करु शकलो. ही माझासाठी आयुष्यभर संस्मरणीय घटना आहे, असे नागपूर ते दिल्ली हवाईसफर करुन परत आलेली खरबी येथील विद्यार्थीनी श्रध्दा सुरेश जौंजाळ सांगत होती.
ठळक मुद्देसंस्काराचे मोती स्पर्धा : खरबीच्या विद्यार्थिनीची हवाई सफर