दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ५ वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता रामधून, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत प्रवचन, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, रात्री ८ वाजता प्रवचन सुरू आहे. भागवत सप्ताहात मऱ्हेगाव, ढिवरखेडाच्या महिला भजनी मंडळ आपल्या संचासह हजेरी लावत आहेत. संगीत संचात प्रफुल्ल पवनकर, ऑर्गन वादक अशोक नागपुरे, तबलावादक दिनेश वाघाडे, तसेच काकडा व गायन हभप शिवशंकर सामृतवार यांच्या सहयोगाने भागवत सप्ताहात वेगळाच आनंद मिळात आहे. सप्ताहासाठी सरिता हेमने, माधव थेर, रवींद्र कठाणे, टोलीराम थेर, भागवत हेमने, आशाबाई घावडे, रंजनाबाई बोरकर, माधव मौदेकर, वृंदन उरकुडे ,धर्मदास धनजुळे, गंगाधर कावळे, अंतकला कावळे, पुरुषोत्तम हेमने, प्रशांत शेंडे, मंदा तरोने, विलास उरकुडे, विलास शिवणकर, प्रदीप शिवणकर, रामेश्वर बहेकार, उदयभान बहेकार, यादवराव थेर, अरविंद हेमने, चोपाराम बहेकार, सचिन शिवणकर, रामभाऊ थेर सहकार्य करीत आहेत.
ढिवरखेडा येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:35 AM