लाखनी तालुक्यातील तई येथील शिवमंदिरात आयोजित भागवत सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच भाग्यश्री भेंडारकर, माजी सरपंच सरिता भेंडारकर, सुखदेव भेंडारकर, शारदा येवले, अरुण चाचेरे उपस्थित होते.
दररोज सकाळी ५.३० वाजता काकड आरती कवडू महाराज किटाळी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सकाळी ७.३० वाजता रामधून, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत प्रवचन, सायंकाळी ५.३० वाजता हरिपाठ आणि सायंकाळी ७ वाजता भागवत प्रवचन असे कार्यक्रम होत आहेत. संगीतमय भागवत सप्ताहला महाराजांच्या सोबतीला राजेश कुंभरे, विजय क्षीरसागर, मुरलीधर कावळे, सुरेश बगमारे, यादोराव उरकुडे साथसंगत करत आहेत. ८ जानेवारी दुपारी १ वाजता गोपालकाला आणि राम लोटांगण महाराजांचे कीर्तन होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनील मेंढे, सुरेश ब्राह्मणकर, हरगोविंद नखाते, मनोहर राऊत, सुभाष गिलवानी, प्रदीप बुराडे, संतोष शिवणकर, शुद्धमता नंदागवळी, गोपीचंद भेंडारकर, रजत गौरकर, सरपंच भाग्यश्री भेंडारकर, सुदेश बारसागडे, सरपंच टिकाराम तरारे वाकल, सरपंच अमृत मदनकर, प्रकाश चुटे, रमेश मटाले, नरेश चाचेरे, गणेश भेंडारकर, अर्चना फुंडे, कारूजी नान्हे उपस्थित राहतील.