मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन : माजी पदाधिकाऱ्यांचा असंतोषमोहाडी : शेतकरी याही वर्षी धानाच्या पिकाला मातीमोल झाला आहे. किडीच्या प्रभावाने धान उध्वस्त झाला. अवर्षणाची झळ सोसणाऱ्या शेतकऱ्याला वैफल्यता आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोहाडीचे तहसिलदार यांना निवेदन सादर केले.मोहाडी तालुक्यामधील शेतकरी तीन वर्षापासून अंशत: अवर्षणाची झळ सोसत आहे. या वर्षीचे खरीप हंगामामध्ये अर्धे अधिक धान पिक पावसाअभावी करपून गेले आहेत. सिंचनाची सोय होती तेथील धानपिक विविध किडीच्या प्रकोपाने नष्ट झाले. नाईलाजाने शेतकऱ्यास शिल्लक धान पेटवून देण्यात आले. एकंदरीत तालुक्यातील शेतकरी यावर्षी तीव्र अवर्षणाने हतबल झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये वैफल्यता आली आहे. यावेळी त्यास सावरणे आवश्यक झाले आहे. अन्यथा शेतकरी आत्महत्या करण्यास मागे बघणार नाही. मोहाडी तालुक्यामध्ये जे काही अत्यल्प धानपिक शेतकऱ्यांच्या पदरी पडले त्यासाठी कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. आधारभूत धान खरेदी केंद्र पुरेसे सुरू करण्यात आले नाहीत. सुरू झालेल्या केंद्रावर बारदाणा उपलब्धताही परिणामी शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्राचे परिसरात बेवारास धान पडून आहेत. त्यामुळे प्रशासनाविरूद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यासाठी मोहाडी तालुक्यातील माजी पदाधिकाऱ्यांनी शासनाशी लढा देण्यासाठी मोहाडी तालुका माजी पदाधिकारी मंच तयार केला आहे. या मंचाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, एमआयईजीएसची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावी, धानास प्रतिक्विंटल ५०० रूपये बोन जाहीर करण्यात यावा, धान खरेदी केंद्रावर ईलेक्ट्रॉनिक वजन काटा लावावा व पुरेश्या बारदाण्याची व्यवस्था करावी, तसेच चोवीस तास कृषी पंपांना विज पुरवठा करण्यात यावा या मागणीचे निवेदन तहसिलदार थोटे यांना देण्यात आले. त्यानंतर तहसिलदाराशी मागण्या संबंधात चर्चा करताना विणा झंझाड, भोजराम पारधी, झगडू बुधे, शिला झंझाड, अल्का बांते, प्रभू मोहतुरे, किरण अतकरी, बाबू ठवकर, ग्यानीराम शेंडे, उपेश बांते, रतिराम बुराडे, हरिभाऊ डोये, निलकंठ पुडके, आत्माराम आगाशे, डॉ. उल्हास बुराडे, महेंद्र शेंडे, आशिष पात्रे, अनिल काळे, वासुदेव बांते, मंजूषा पात्रे, कमलेश कनोजे, मनोहर सिंगनजुडे, रामप्रसाद पुडके, रामचंद्र हिंगे, रत्ना फेंडर, कार्तिक ईश्वरकर, भगवान सिंनगजुडे, मिलिंद रामटेके, वर्षा झंझाड, गणेश निमजे, गणेश कुकडे, देवराम निखारे, संजय मिराशे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
सरसकट कर्जमाफी द्या
By admin | Published: December 04, 2015 12:53 AM