शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

एकरकमी परतफेड योजना लागू

By admin | Published: February 02, 2015 11:01 PM

राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अनुत्पादक कर्जामधील प्रभावी वसुलीसाठी तसेच सहकार आयुक्त व निबंधकांनी केलेल्या शिफारसीनुसार नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड

भंडारा : राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अनुत्पादक कर्जामधील प्रभावी वसुलीसाठी तसेच सहकार आयुक्त व निबंधकांनी केलेल्या शिफारसीनुसार नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्यासाठी शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने मंजुरी दिली आहे. नागरी सहकारी बँकांची एक रकमी कर्ज परतफेड योजना मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरी सहकारी बँकांचे वाढते एनपीए कमी करण्याच्या दृष्टीने ‘एक रकमी कर्जपरतफेड योजना’ ही चांगली असून सदर योजनेस वेळोवेळी मुदतवाढ दिल्यामुळे नागरी सहकारी बँकांचे वाढते एनपीए कमी होण्यास आतापर्यंत मदतच झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन या योजनेस पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे. या योजनेबाबत शासनाने काही निकष ठरवून दिले आहे. त्यानुसार सदर योजना स्वीकारणे बँकांवर बंधनकारक नाही. मात्रही योजना स्वीकारल्यानंतर ती सर्व कर्जदारांमध्ये कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने लागू करणे बंधनकारक आहे.बँकांना त्याचे कर्ज त्वरेने वसूल करण्याच्या हेतुने सदर योजना निर्गमित करण्यात आली असून कोणत्याही कर्जदारास याबाबत हक्क सांगता येणार नाही. एनपीएची तारीख व वर्गवारी बँकेच्या दप्तराप्रमाणे व लेखापरीक्षकांनी प्रमाणित केल्याप्रमाणे निश्चिात करण्यात येणार आहे. या योजनेबाबत कर्जदार व बँकांमध्ये काही वाद झाल्यास त्याबाबत सबंधित तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर कर्ज परतफेड योजनेअंतर्गत कर्जखाते बंद करताना सबंधित कर्जदारास नव्याने कर्ज अथवा सवलत देता येणार नाही. तसेच तो बँकेतीलकोणत्याही कर्जास किंवा सवलतीस पाच वर्षे जामीन राहू शकणार नाही. एक रकमी कर्ज परतफेड योजना कर्जदारास मंजूर केल्यानंतर कर्जदाराने किमान २५ टक्के रक्कम मंजुरीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत व उर्वरित रक्कम जास्तीत जास्त ११ मासिक हप्त्यात भरणे आवश्यक आहे. कर्जदाराने सुरूवातीस भरावयाची रक्कम २५ टक्केहून कमी करण्याबाबत संचालक मंडळास त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याबाबत अधिकार असेल, मात्र कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण रकमेचा भरणा ११ महिन्यात पूर्ण होणे आवश्यक असल्याचे शासनाने म्हटले आहे. या योजनेची मुदत ३१ मार्च २०१५ पर्यंत राहील तसेच २८ फेब्रुवारी २0१५ पर्यत प्राप्त अर्जांवर ३१ मार्च २०१५ पर्यत कार्यवाही करणे आवश्यक असल्याचेही शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. नागरी बँकांसाठी ही योजना फायद्याची ठरेल. (नगर प्रतिनिधी)