शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

स्वावलंबनाचा वारसा अन् रोजगार देणारे सिरसोली गाव

By admin | Published: June 03, 2017 12:23 AM

स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा व स्वयंरोजगार हे गुण वारसान मिळत आपसूक संस्कार होतात तेव्हा स्वत:ची अन् गावाच्याही समृद्धीत वाढ होते.

लोकमत शुभ वर्तमान : महिन्याकाठी लाखोंची उलाढाल, लोकसहभागातून विकास, पाण्याची समृद्धीराजू बांते। लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा व स्वयंरोजगार हे गुण वारसान मिळत आपसूक संस्कार होतात तेव्हा स्वत:ची अन् गावाच्याही समृद्धीत वाढ होते. समृद्ध व स्वयंरोजगाराच्या भरवशावर महिन्याकाठी लाखो रूपयांची उलाढाल करत अनेकांच्या हाताला रोजगार मिळवून देणाऱ्या सिरसोली (कान्हळगाव) या गावाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.तरूणांच्या हातात सत्ता आल्यावर गावाचा कायापालट झाला. विकासकामे लोकसहभागातून करण्यात आलेल्या प्रगतीमुळे १०७४ लोकवस्तीचे सिरसोली (का.) हे गाव लौकिकास पात्र ठरले आहे. १७४ कुटुंबसंख्या असलेल्या या गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. परंपरागत व्यवसाय, श्रम करण्याची जिद्द, स्वावलंबन, उद्योगाच्या जोरावर ग्रामस्थांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही. दहा ते बारा कुटुंब वगळता सर्वांच्या घरी शेती आहे. ४५ शेतकऱ्यांच्या शेतावर इनवेल बोअर आहेत. २५ विहिरी आहेत. समृद्ध सिंचनाच्या भरवशावर या गावाचे ४५ शेतकरी वर्षभर वांगे, चवळी, भेंडी, मिरची आदी भाजीपाला पिकाची लागवड करतात. उत्पादीत माल स्वत:च शहरात नेऊन विकतात. अनेकजण तुमसर, भंडारा, मोहाडी, आंधळगाव या मोठ्या बाजारात बसून स्वत: मालाची विक्री करतात. शेतीत धान, गहू आदी ही पिक घेतले जाते. शेतीला पुरक सिरसोली येथे दुग्ध व्यवसायही आहे. घर तिथे जनावर असा गाव आहे. त्या गावात तीन दूध संकलन केंद्र आहेत. सालई, उसर्रा, वडेगाव, सिरसोली, कान्हळगाव आदी गावातून सुरकन दमाहे, अंकुश दमाहे, गजानन दमाहे दुध संकलन करतात. महिन्याकाठी ३४ लाख रूपयाचा दुग्ध व्यवसाय होतो. ग्रामविकास दुग्ध सहकारी संस्था आहे. पण थकीत पेमेंटच्या समस्येमुळे ती संस्था डबघाईस आली आहे. या गावात १५ शेतकरी उन्हाळी भाताचे पिक घेतात. कान्हळगाव, पिंपळगाव, सिरसोली, हरदोली या गावातील मजुरांना बारमाही रोजगार मिळवून देणारे गणेश मोहारे, अरुण कस्तुरे, प्रकाश कस्तुरे, सुरेश सव्वालाखे, अशोक कस्तुरे हे शेतकरी आहेत. या गावात लाल मिरची विक्रीचा व्यवसाय गोपी मुटकुरे, राजू मुटकुरे, आरिफ तेले, इस्माईल तेले करतात. या गावात कुक्कुटपालन, फर्निचर मार्ट, पोतीचे शिवणकाम करतात. शेती, दुग्ध, मिरची, भाजीपाला व्यवसायामुळे सिरसोली गाव संपन्न बनले आहे.भौतिक सुविधावर उधळपट्टी करण्याची प्रवृत्ती या गावात नाही. तरुणांच्या हातात गावाची नाळ आहे. सरपंच कला कस्तुरे, उपसरपंच अंकुश दमाहे तसेच खलील छव्वारे, प्रताप लिल्हारे, अरुण कस्तुरे, रमेश बशिने, राजू बावणे, रुपेश फुलेकर, नरेश सव्वालाखे यांनी स्वबळावर सिरसोली हरदोली, मुरुम रस्ता, कब्रस्तानमधील सपाटीकरण व ओट्याचे काम, बौद्ध विहाराचे सपाटीकरण, मंदिराचे सौंदर्यीकरण, हरदोली रस्त्यावरचे प्रवेशद्वार, स्मशानभूमीतील पानवठा, एक हजार मीटर पाईप लाईन, नवीन टाकीला कंपाउंड, शंकराची मूर्ती, नाला आदी कामे श्रमदान व लोकसहभागातून करण्यात आले. मुस्लिम, बौद्ध, हिंदूच्या स्मशानभूमीच्या अडचणी दूर करण्यात आले. वीज, रस्ते, सपाटीकरण, नमाज स्थळ सौंदर्यीकरण करण्यात आले.या गावाचे वैशिष्टय म्हणजे अनेक दशकापासून असलेली दारुबंदी. यात गावाचे पहिले सरपंच मोगल नूरबेग संदल बेग व झिबल दमाहे यांचा वाटा मोठा आहे. १७४ कुटुंबापैकी ७८ कुटुंबांनी परमात्मा एक मानव धर्म स्वीकारला आहे. जयगोपाल दमाहे, पूंजाराम बंधाटे, आसाराम सव्वालाखे, सिरसोली गावचे प्रथम सेवक होते. आसाराम सव्वालाखे यांनी परिसरातील गावात परमात्मा एक मानव सेवेचे मार्गदर्शक व प्रचारक म्हणून काम केले. त्यानंतर नरेश सव्वालाखे मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहेत. गावात परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने प्रार्थना स्थळावर सामूदायीक एकतेची ज्योत ५.३० सकाळी पेटविली जाते. सकाळी पहाटे उठून १३५ बालक प्रार्थना स्थळावर जमा होतात. यात त्यांना मानव धर्माची शिकवण व आईवडील व थोरांना नमस्काराची सवय रूजविले जातात. महिन्याच्या एक तारखेला प्रभातफेरी काढली जाते. वर्षात जयंती पुण्यतिथी कोजागिरी, प्रगटदिन, सेवक संमेलन, हळदीकुंकू कार्यक्रम घेतले जातात. सिरसोली गावात अंधश्रद्धा, स्वच्छता अभियान, दारुबंदी व व्यसनमुक्तीचे धडे गिरविले जातात. प्रभाकर अजाबराव दमाहे हा युवक लग्नकार्य व इतर कार्यक्रमात कचऱ्याची सफाई करण्यासाठी पुढे येतो. त्याला ‘स्वच्छतादूत’ म्हणून ग्रामपंचायत कडून मानधन दिले जाते. स्व.बळीराम कस्तुरे यांनी १० एकर शेती दान केली. ४० वर्षापूर्वी गावात स्वच्छतागृहाची योजना राबविली. आचार्य विनोबा भावे यांचे ते अनुयायी होते. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सीताराम स्वामी या संतांच्या सोबत राहण्याचा त्यांना योग आला होता. भूदान चळवळीत त्यांनी काम केले. कृष्ण महर्षी डॉ.शिवाजी पटवर्धन स्मृती समाजसेवक पुरस्कार व वैनगंगा मानवता सेवा संघ पुरस्कार २००७ रोजी त्यांना देण्यात आला. आज या गावात उद्योग, व्यवसाय यामुळे गावात समृद्धी आली. गाव पाणी समृद्धही झाला आहे. पाण्याची टंचाई नाही. वीज, रस्ते, पाणी, स्वच्छता, खेळाचे मैदान, एमआरईजीएस मधून शेतीसाठी तयार झालेले पक्के रस्ते, यामुळे गावात विकासाची पताका झळकत आहे. तरुणांच्या कामामुळे २००७ ला निर्मल गावाचा पुरस्काराही प्राप्त या गावाने केला आहे.कर्तृत्ववान महिलांची भरारीदूध उत्पादक म्हणून सिरसोलीच्या महिला आघाडीवर आहेत. स्वत: गाई म्हशींचे दूध काढण्याचा कामही करतात. यात सीमा दमाहे,प्रमिला कस्तुरे, अर्चना दमाहे, देवकी लिल्हारे, मंगला गाढवे, शालू दमाहे, राजकुमार कस्तुरे, कुसुम बंधाटे, कलावती मते, रेखा गाढवे या कर्तृत्ववान महिलांचा समावेश आहे. सिरसोली कान्हळगाव या दोन गावाचे अंतर हाकेवर आहे. कान्हळगावात शनिवारी आठवडी बाजार भरतो. त्या बाजारात ९९ टक्के भाजीविक्रेते सिरसोलीचेच असतात. यात प्रामुख्याने भाजी विकणाऱ्या महिलाच अधिक दिसून येतात.