लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धर्मादाय आयुक्त मुंबई यांचे पुढाकाराने सहायक धर्मादाय आयुक्त भंडारा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सामूहिक विवाह समितीतर्फे शुक्रवारी आदिशक्ती श्री शीतला माता मंदिर भंडारा येथे सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात सहा जोडपे विवाहबद्ध झाले.सामूहिक विवाह सोहळ्याला सहधर्मादाययुक्त एस. कोल्हे, सहायक धर्मदायुक्त मालोदे, आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, माजी आमदार अॅड. आनंदराव वंजारी, केशवराव निर्वाण प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सहा वधू-वरांना संसरापयोगी साहित्यांचे वितरण करुन त्यांना शुभार्शीवाद देण्यात आला. प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष ईश्वरलाल काबरा यांनी केले. समिती सदस्य अॅड. एम. एल. भुरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अॅड. आनंदराव वंजारी, केशवराव निर्वाण यांनी सामूहिक विवाह ही काळाची गरज असून कर्जबाजारी होण्याचे टाळून सामूहिक विवाह सोहळ्याला प्राध्यान्य द्यावे, असे आवाहन केले. यावेळी डॉ. लोकनाथ गिरीपुंजे, सत्यनारायण व्यास, संतोष शर्मा, विजय खंडेरा, के. एन. नन्हें, अर्जुन क्षीरसागर, जाधवराव साठवणे, रामदास शहारे, प्रेमलाल लांजेवार, नरेश अंबिलकर, हर्षल मेश्राम, संतोष राठी यांच्यासह समितीचे अध्यक्ष धनंजय दलाल, सचिव अॅड. शशीर वंजारी, कोषाध्यक्ष मदनलाल लाहोटी, सदस्य रमेशलाल गंगवाणी, सहसचिव धनराज धुर्वे उपस्थित होते.समितीचे सदस्य मधुकर चेपे, रामेकर, नानोटी यांनी मंगलाष्टके तर, मंगल परिणय विष्णुदास लोणारे व धम्ममित्र सुधीर खोब्रागडे यांनी पार पडला. संचालन अॅड. शशीर वंजारी यांनी केले. सदर सोहळ्याला रामलाल चौधरी अरविंद कारेमोरे, प्रमोद गभणे यांच्यासह शीतल तिवारी, प्रमोद मानापुरे, सचिन घनमारे, राजकपूर राऊत, विकास मदनकर, नितीन तुमाने, शैलू श्रीवास्तव, विनीत देशपांडे, सुहास गजभिये, पराग खोब्रागडे, अभिजीत वंजारी, रुपेश भद्रे, श्रावण गभणे, नितीन कुथे, संजय मते, सतीश सार्वे, मोनू गोस्वामी, इंदिरा काबरा, गीता धुर्वे, रिता वंजारी, सीमा अगरवाल, अंशू पांडे, सुनीता बोरकर, रेणू धकाते, स्मिता भांगे, मंजुषा गायधनी, सुनीता वंजारी, चंदा मुरकुटे, भारती लिमजे, भावना शेंडे, प्रिया खंडारे, रजनी मुळे आरती फुके यांनी सहकार्य केले.
सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जोडपे विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:22 PM
धर्मादाय आयुक्त मुंबई यांचे पुढाकाराने सहायक धर्मादाय आयुक्त भंडारा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सामूहिक विवाह समितीतर्फे शुक्रवारी आदिशक्ती श्री शीतला माता मंदिर भंडारा येथे सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात सहा जोडपे विवाहबद्ध झाले.
ठळक मुद्देसहायक धर्मादाय आयुक्तांचा उपक्रम : संसारोपयोगी साहित्यांचे वितरण