शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

मोहाडी तहसीलदारांना सहा तास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:09 PM

आबादी प्लॉटमधील घर महसूल प्रशासनाने जमीनदोस्त केल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील सिरसोली येथील गावकऱ्यांनी तहसीलदारांना सोमवारी तब्बल सहा तास घेराव घातला. सुमारे २०० ते ३०० महिला व पुरूष या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महिलांना तहसीलदारांच्या नावाने बांगड्या फोडून निषेध व्यक्त केला. अखेर सायंकाळी ६ वाजता या प्रकरणावर तोडगा निघाला.

ठळक मुद्देसिरसोलीचे नागरिक : अतिक्रमित घराचे प्रकरण, महिलांनी केला बांगड्यांचा अहेर

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : आबादी प्लॉटमधील घर महसूल प्रशासनाने जमीनदोस्त केल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील सिरसोली येथील गावकऱ्यांनी तहसीलदारांना सोमवारी तब्बल सहा तास घेराव घातला. सुमारे २०० ते ३०० महिला व पुरूष या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महिलांना तहसीलदारांच्या नावाने बांगड्या फोडून निषेध व्यक्त केला. अखेर सायंकाळी ६ वाजता या प्रकरणावर तोडगा निघाला.सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे आबादी प्लॉटवरील राहते पक्के घर नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्या आदेशाने जमीनदोस्त करण्यात आले होते. याप्रकारामुळे सिरसोली गावात महसूल विभागाविरूद्ध प्रचंड असंतोष पसरला होता. या प्रकरणाचा रोष व्यक्त करण्यासाठी सिरसोली येथील शेकडो महिला व पुरूष सोमवारी सकाळी येथील तहसील परिसरात जमा झाले. त्यानंतर सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास महिला व पुरूषांनी तहसीलदारांच्या कक्षाचा ताबा घेतला. तहसीलदार धनंजय देशमुख यांना घेराव घातला. चुकीचे पत्र देणाºया नायब तहसीलदार कातकडे यांना त्वरीत निलंबित करा, घराच्या नुकसानीची रक्कम तात्काळ द्या, बेघर झालेल्या लिल्हारे परिवाराला निवासाची सोय करा आदी मागण्या नागरिक करीत होते. तहसीलदार धनंजय देशमुख केवळ बघ्याची भूमीका घेत होते. ते काही बोलायला तयार नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी खुर्च्या व अन्य साहित्य तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. बराचवेळ तहसीलदार निशब्द बसून होते.यावेळी लोकांचा रोष बघून नायब तहसीलदार कातकडे यांनी बाहेरचा रस्ता धरला. सुमारे सहा तास आंदोलनकर्ते बेघर भावांनी मांडलेल्या उपोषण मंडळपात तर कधी तहसीलदारांच्या कक्षात बसून वाटाकाटी करीत होते.दरम्यान तुमसरचे एसडीओ मुकुंद तोंडगावकर मोहाडी तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यांच्याविरूद्धही संताप व्यक्त केला जात होता. यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर, किसान नेते माधवराव बांते, राष्ट्रवादीचे नेते राजू कारेमोरे, काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोेरे, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, किरण अतकरी, केशव बांते, प्रमोद तितीरमारे, विजय शहारे, सदाशिव ढेंगे, रमेश पारधी, समील पठान, शंकर मोहारे आदींनी प्रयत्न केले.तब्बल तीन तास चर्चा होवूनही एसडीओ व तहसीलदार निर्णय घेण्यात असमर्थ असल्याचे दिसत होते. परिस्थितीती हाताबाहेर जाण्याचे चिन्ह दिसत असल्याने मोहाडी, आंधळगाव, वरठी येथून पोलिसांची कुमक पाचारण करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक बंडू थेरे, एपीआय बंडू बानबले, पीएसआय विवेक राऊत, सुरेश बुंदे आदी उपस्थित होते.यावेळी महिलांनी रोष व्यक्त करीत आपल्या हातातील बांगड्या फोडून तहसीलदारांना अहीर केला. तर काही काळ तहसीलदार कक्षातून निघून गेल्याने त्यांना बोलवा, अशी मागणी होवू लागली. सुमारे एक तासानंतर तहसीलदार हजर झाले. अखेर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास या प्रकरणात यशस्वी वाटाघाटी झाल्या. तसेच तहसीलसमोर असलेले लिल्लारे बंधूचे उपोषणही मागे घेण्यात आले.काँग्रेस नेता झाला शासकीय वाहनाचा सारथीसिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे दोन मुले व काका उपोषणावर बसले होते. शिवलाल रुग्णालयात दाखल होते. त्यांनाही सोमवारी उपोषणस्थळी आणण्यात आले. उपोषण सुटल्यानंतर शासकीय वाहनाने त्यांना सिरसोली येथे सोडून देण्याचे ठरविले. परंतु तहसील कार्यालयाकडे चालकच उपलब्ध नव्हता. त्यामुळे उपोषणकर्त्यांना सिरसोली येथे सोडून देण्यासाठी काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे शासकीय वाहनाचे सारथी झाले. लिल्हारे परिवाराला त्यांनी सिरसोली येथे सोडून दिले. यावेळी तहसीलदार धनंजय देशमुखही वाहनात बसले होते.