शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

अपघातात सहा जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 10:19 PM

परस्पर विरुध्द दिशेने येणाऱ्या मारुती व्हॅन आणि दुचाकीची टक्कर होवून व्हॅनमधील चार जण तर दुचाकीवरील दोन जण असे सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मोहाडी-तुमसर मार्गावरील ग्रिनव्हॅलीसमोर सोमवारी रात्री ९.३० वाजता घडला.

ठळक मुद्देतुमसर-मोहाडी मार्ग : मारुती व्हॅन व दुचाकीची समोरासमोर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : परस्पर विरुध्द दिशेने येणाऱ्या मारुती व्हॅन आणि दुचाकीची टक्कर होवून व्हॅनमधील चार जण तर दुचाकीवरील दोन जण असे सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मोहाडी-तुमसर मार्गावरील ग्रिनव्हॅलीसमोर सोमवारी रात्री ९.३० वाजता घडला.मोहाडी येथील औषध विक्रेता विनोद सव्वालाखे (४५) हे तुमसरवरुन मारुती व्हॅन क्रमांक एम एच ३६ एच ६७१५ ने मोहाडीकडे येत होते. तर पवन डोंगरे (३४) व सावंत डोंगरे (२८) रा. खरबी हे दोघे आपल्या दुचाकीने खरबीकडे जात होते. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास या दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. त्यात पवन व सावंत डोंगरे यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. तर मारुती व्हॅनचे संतुलन जावून ती बारच्या भिंतीवर आदळली. त्या व्हॅनमधील वासुदेव सव्वालाखे (७०), संगीता विनोद सव्वालाखे (३६), गौरव सव्वालाखे (११) यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. यात व्हॅनमध्ये प्रवास करणाºया ९ वर्षाच्या मुलाला मात्र सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. जखमींना तात्काळ मोहाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सर्व जखमींना भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले.