चंपा यशवंत नागपुरे (५५) रा. गोपेसर ता. तिरोडा असे महिलेच नाव आहे. त्या मुलगा ओम नागपुरे यांला भेटण्यासाठी हिंगणा, नागपूर येथे गेल्या होत्या. परतीच्या प्रवासात, सोमवारी नागपूरहून तुमसर बसमध्ये प्रवास करीत होत्या. त्यांच्या शेजारी दोन महिला मौदा बसस्थानकावरून बसलेल्या. त्या दोघीही ठाणा येथे ११:३० वाजता सुमारास उतरल्या. त्यानंतर चंपा नागपुरे यांचे बॅगकडे बघितले. त्यावेळी बॅगची चेन उघडी दिसली. बॅगमध्ये बघितले असता सहा तोळ्यांचे मंगळसूत्र पळविल्याचे दिसून आले. जवाहरनगर ठाण्यात तक्रार दिली. ३६ वर्ष जुने सहा तोळ्याच्या मंगळसूत्राची किमत पोलिसांनी २४ हजार लावून दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला. या दोन्ही महिला ३० ते ३५ वयोगातील असून तपास पोलीस हवालदार एकनाथ जांभूळकर करीत आहे.
बस प्रवासात सहा तोळ्याचे मंगळसूत्र लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:42 AM