शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

स्वाईन फ्ल्यूचे सहा संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:32 PM

जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या आजाराने चांगलाच हैदोस घातल्याचे समोर येत आहे. एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयात संशयित सहा रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देजिल्हा आरोग्य प्रशासन सरसावले : आतापर्यंत ६७६ संशयित इन्फ्ल्युएंझा रुग्णांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या आजाराने चांगलाच हैदोस घातल्याचे समोर येत आहे. एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयात संशयित सहा रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या आजाराने महिन्याभरात जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याला खुद्द आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे.तुमसर तालुक्यातील चांदमारा येथे स्वाईन फ्ल्यूची लागण होवून इसमाचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसातच या आजारापासून रुग्ण दगावल्याचे हळूहळू स्पष्ट होत गेले. मागील आठवड्यात जिल्हा रुग्णालयात संशयित दोन स्वाईन फ्ल्यू रुग्णांपैकी एकाला नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू आजाराने पाय रोवल्याचे लक्षात येताच रक्त तपासणी व अन्य चाचपणी करण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली आहे. इन्फ्ल्युएंझा सदृष्य लक्षणे असल्यास त्वरीत जवळच्या आरोग्य संस्थेत जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार सूर्यवंशी यांनी केले.आतापर्यंत सहा जणांचा मृत्यूजिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू या आजारामुळे आतापर्यंत सहा रूग्णांचा बळी गेला आहे. मागील आठवड्यात तुमसर तालुक्यात देवदर्शनाहून परत आलेल्या आणखी एका भाविकांचा मृत्यू झाला होता. संघमित्रा तुरकने (५०) रा.देवरीदेव असे मृत महिलेचे नाव होते. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. संतोष माने (३६) रा.भंडारा यांचा ४ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यानंतर ५ सप्टेंबरला ईश्वरदयाल देशमुख (५०) यांचा तर ७ सप्टेंबरला निलावंती झोडे (३५) रा.चांदमारा, ८ सप्टेंबरला संघमित्रा तुरकने या महिलेचा मृत्यू झाला आहे. यानंतर अजुन दोघांचा मृत्यू झाला.सर्वच रुग्णालयात उपचारस्वाईन फ्लू आजाराची साथ सध्या जिल्हयात आढळून येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता जिल्हयातील सर्व शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू या रोगावर उपचार करण्यात येत असून स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.जिल्हयातील सामान्य रुग्णालय भंडारा व उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे इन्फ्ल्युएंझा करीता विशेष तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे इन्फ्ल्युएंझा आजाराच्या रुग्णांना भरती करण्याकरीता विशेष अलगीकरण कक्ष स्थापित करण्यात आले असून तेथे रुग्णांचे गळयाचे स्वॅब नमुने तपासणी करीता गोळा करुन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. स्वाईन फ्ल्यु उपचाराकरीता लागणारे आॅसेल्टामीवीर (टॅमीफ्ल्यू) औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध आहे.संशयित रुग्णांची तपासणीजिल्हयामध्ये आरोग्य विभागामार्फत ६७६ संशयित इन्फ्ल्युएंझा रुग्णांची तपासणी करण्यात आलेली असून २१ रुग्णांना उपचाराकीरता शासकीय रुग्णालयात व १२ रुग्णांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या रुग्णांपैकी १३ रुग्णांचे स्वॅब नमुने इन्फ्ल्युएंझा आजाराकरिता दूषित आढळल्याची माहितीही जिल्हा आरोग्य प्रशासनाने उघड केली आहे.