मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सातपुडा पर्वत रांगातून जाणाऱ्या गोबरवाही-तुमसर आंतरराज्यीय रस्त्याच्या दुपदरीकरणाला मंजूरी प्राप्त झाली आहे. मात्र या रस्ता रुंदीकरणात या मार्गावर तब्बल १२०० वृक्षांची कत्तल होणार आहे. तसेच तुमसर-देव्हाडी रस्ता चौपदरीकरणातही शेकडो वृक्षांचा बळी जाणार आहे. महिन्याभरात रस्त्याची कामे सुरु होणार असल्याची माहिती आहे.प्रशस्त व दर्जेदार रस्ते बांधकामाला भंडारा जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जोमाने कामाला लागला आहे. तुमसर- गोबरवाही तथा तुमसर- देव्हाडी असा रस्ता सुमारे २१ किलोमिटर बांधकामाला हिरवी झेंडी प्रापत झाली आहे. निविदा मंजूर झाली असून ७८ कोटीचाकामाला एका महिन्यात सुरुवात होणार आहे. तुमसर- गोबरवाही रस्ता आंतरराज्यीय मार्ग आहे. सातपुडा पर्वत रांगातील घनदाट जंगलातून हा रस्ता जातो. मध्यप्रदेशाकडे जाणारा हा रस्ता जंगलसफारीची आठवण करुन देतो.येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल असून दुपदरीकरणात सुमारे १२०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. जुनी उंच्च व देखण्या झाडांचा येथे बळी घेतला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच वनविभागाची परवानगी घेतल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात कितीतरी जास्त झाडे कापली जाणार आहे. शासकीय आकडा केवळ १२०० झाडांचा आहे.अगदी रस्त्यालगत घनदाट जंगल असून एकमेकात गुंफल्यासारखी ही झाडे आहेत. अनेक डोलदार झाडांचा त्यात समावेश आहे. उन्हाळ्यात सावली देणारे हे वृक्षआता तोडली जाणार असल्याने अनेकांना चुटपूट लागली आहे.तुमसर-देव्हाडी हा पाच किमीचा रस्ता चौपदरी होणार आहे. या रस्त्याशेजारी शेकडो वृक्ष कापली जाणार आहे. पर्यावरण विभागाची मंजूरी घेतल्याची माहिती आहे. तालुक्यातील शेकडो वृक्षांची कत्तल होत असतांना पर्यावरणप्रेमी मात्र शब्द बोलायला तयार नाही. युवक काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे म्हणाले, विकास कामे झालीच पाहिजे पंरतु वृक्ष तोडल्यानंतर संबंधित विभागाने तीपट झाडे लावण्याची गरज आहे.तुमसर-गोबरवाही तथा तुमसर- देव्हाडी रस्ता बांधकामाला मंजूर प्राप्त झाली आहे. निविदा प्रक्रियाही पुर्ण झाली आहे. एक महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून वृक्ष कापण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे.- राजेश खंडेलवाल,उपविभागीय अभियंता, तुमसर
आंतरराज्यीय रस्त्यासाठी होणार १२०० वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:07 PM
सातपुडा पर्वत रांगातून जाणाऱ्या गोबरवाही-तुमसर आंतरराज्यीय रस्त्याच्या दुपदरीकरणाला मंजूरी प्राप्त झाली आहे. मात्र या रस्ता रुंदीकरणात या मार्गावर तब्बल १२०० वृक्षांची कत्तल होणार आहे. तसेच तुमसर-देव्हाडी रस्ता चौपदरीकरणातही शेकडो वृक्षांचा बळी जाणार आहे. महिन्याभरात रस्त्याची कामे सुरु होणार असल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देसातपुडा पर्वत रांगा : तुमसर-गोबरवाही व देव्हाडी रस्त्यालगतचे वृक्ष