लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा कोसरा : अड्याळ ते कोंढा दरम्यान राज्य मार्गावर सध्या जेसीबी मशिनद्वारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडे सपाट करण्याचे काम सुरु आहे. शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाला हे एक प्रकारे आवाहन आहे. यामुळे कोंढा ते अड्याळ मार्गावरील हजारो झाडे नष्ट झाली आहे.कारधा ते निलज या राज्य मार्गाचे रुंदीकरणाचे काम करण्यासाठी झाडाची कत्तल खुलेआम सुरु आहे. दोन वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने कोंढा ते अड्याळ पर्यंत लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतले होते. यासाठी वर्षभर मजूर लावून त्या झाडांना पाणी देऊन जगविले. या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत करंजी, कडुलिंब, निलगिरी, जांभूळ, बेल अशा विविध प्रकारच्या वृक्षाची लागवड केली. ती झाडे चार, पाच फुट झाली असताना अॅटकान इंडिया लिमिटेड दिल्ली या कंपनीतर्फे जागेचे सपाटीकरण सुरु केले आहे.या संबंधात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता साडेपाच मिटर रोडपासून दोन्ही बाजूला राज्यमार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही भागाचे सपाटीकरण करीत असल्याचे सांगितले. कंपनी जेवढे झाडे तोडणार आहे तेवढे झाडे लावणार आहे असे देखील ते म्हणत आहेत. पण राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम करावयाचे होते तर दोन वर्षापूर्वी मार्गावर लाखो रुपये खर्च करून वृक्षलागवड का केली असा प्रश्न निसर्गप्रेमी विचारीत आहेत. शासनाच्या वृक्षलागवडीच्या नावावर लाखो रुपयांचा चुराडा झाला तेव्हा यावर तोडगा निघणे आवश्यक आहे.
राज्यमार्गावरील झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 9:50 PM
अड्याळ ते कोंढा दरम्यान राज्य मार्गावर सध्या जेसीबी मशिनद्वारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडे सपाट करण्याचे काम सुरु आहे. शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाला हे एक प्रकारे आवाहन आहे. यामुळे कोंढा ते अड्याळ मार्गावरील हजारो झाडे नष्ट झाली आहे.
ठळक मुद्देकोंढा ते अड्याळ मार्गावरील प्रकार