मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मनसर - रामटेक - तुमसर -तिरोडा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व सिंमेट काँक्रिटचे बांधकाम अनेक दिवसांपासून सुरु असले तरी कामातील विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींमुळे बांधकाम सध्यस्थितीत संथगतीने सुरु आहे. या मार्गाच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या अखत्यारित येत असलेल्या एका कंपनीच्या कंत्राटदाराकडुन पाच हजारच्या घरात विविध जातीच्या मौल्यवान वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.सदर महामार्गाच्या दुर्तफा वृक्ष कटाईचे परवानगी संबधीत वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने दिली असली तरी या महामार्गालगत दुप्पट वृक्ष नव्याने लागवड करण्यात यावे, अन्यथा महामार्गाचे बांधकाम बंद करण्यात येईल, अशी भूमीका येथील पर्यावरण व वृक्ष प्रेमींनी घेतली आहे.पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी व पर्यावरण पूरक संतूलनासाठी एकीकडे शासनाने 'एकच लक्ष्य १३ कोटी वृक्ष' अभियान राबववित आहेत. मात्र 'एकच लक्ष्य फस्त करा महामार्गाचे वृक्ष' असा फंडा सुरू असून मौल्यवान शंभर वर्ष जूने वृक्षाची कत्तल करण्याचा सपाटा लावला आहे. ग्रामीण ते शहरी भागातील दळणवळणाच्या सूविधा पूर्णत्वास नेण्यासाठी महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरण वाढत्या वाहन साधनाच्या आवागमनासाठी महामार्ग चौपदरीकरणासाठी शासन संबधित विभागाच्या अनधिस्त राहून महामार्गाच्या कामाला अग्रस्थान देत असल्याचा मोठा गाजावाजा करीत आहे. परंतु एका कंपनीच्या संबंधित कंत्राटदाराने या महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या हजारो मौल्यवान वृक्षाची कटाई संबधी रितसर परवानगी घेण्यापूर्वीच दोन हजार पाचशे वृक्षाची बेसुमार कत्तल केली. त्यानंतर संबधित वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून परवानगीसाठी प्रस्ताव मंजूर करून घेतल्याची माहिती मिळाली आहे.जिल्ह्यातील सीमावर्ती भागापासून मोहाडी तालुक्यातील हिवरा ते तुमसर तालुक्यातील खापा चौफूलीपर्यंत बाराशे, तर खापा चौफूलीपासून ते देव्हाडापर्यंत हजार ते बाराशेच्या घरात वृक्षाची कटाई संबधी परवानगी देण्यात आली, अशी माहिती तुमसर वनविभाचे वनपरीक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी यांनी सांगितले.महामार्गच्या दोन्ही बाजूला लहान झाडे आहेत, त्यावर कुणाची मालकी आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. लहान झाडांचा येथे कुणी वाली दिसत नाही. केवळ मोठ्या झाडांना कापण्याची परवानगी कंत्राटदाराने मागितल्याची माहिती आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे कंत्राटदाराने वृक्ष कटाईचे परवानगी मागितली असून त्याचे मूल्यमापन करून देण्यात आल्याचे सांगितले.या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे. रस्ता बांधकामात केंद्र तथा राज्य आणि पर्यावरण खात्याचे अतिशय कडक नियम घालून दिले आहेत. त्या नियमांना येथे फाटा दिला जात आहे. बांधकाम सुरू असलेल्या नागपूर जिल्ह्यातील मनसर ते मोहाडी तालुक्यातील सालई (खुर्द) पर्यत बांधकाम सुरु असलेल्या मार्गालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ च्या हद्दीतील मनसर ते सालई (खुर्द) २८किलोमीटर प्रवास असलेल्या महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या २६२ सागवन जातीचे, तर २०८३ इतर प्रजातीचे असे एकुण २४४५ वृक्ष कटाईसंबधी त्या कंपनीने संबधित विभागाला परवानगी मागितली आहे. संबधितांकडून साधी आक्षेप मागविण्याची संधी देण्यात आली नसल्याची माहिती आहे.तुमसर वनविभागाअंतर्गत खापा ते देव्हाडा (पेपर मील) महामार्ग लगत अकारशे ते बाराशे च्या जवळपास वृक्ष तोडण्याची रितसर परवानगी संबधित कंपनीने वनविभागाकडुन मूल्यमापन करून घेतली आहे . खापा ते हिवरा पर्यंतच्या महामार्ग लगत तितक्याच वृक्षाची कटाई संबधी परवानगी जांब कांद्री वनविभागाकडून घेण्यात आली अशी माहिती आहे.- अरविंद जोशी, वनपरिक्षेत्र अधीकारी तुमसरतुमसर तालुका क्षेत्रातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत सामाजिक वनीकरण अंतर्गत झाडे लावण्यात आली नाही.- आकांशा भालेकर, वनपरीक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण, तुमसरखापा -तिरोडा राष्ट्रीय महामार्ग सिंमेंट क्राँक्रिट बांधकामासाठी हजारो वृक्षांची कत्तल करणाऱ्या संबधित कंपनीच्या कंत्राटदाराने महामार्गाच्या दुतर्फा तोडण्यात आलेल्या वृक्षाच्या, दुप्पट वृक्ष लागवड करण्यात यावे. जेणेकरून पर्यावरणाचा ºहास होणार नाही. अन्यथा संबधीत कंपनी विरोधात आंदोलन करण्यात येईल.- दिलीप सार्वे, पर्यावरण व वृक्षप्रेमी मांगली खापा
राष्ट्रीय महामार्गासाठी वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 1:06 AM
मनसर - रामटेक - तुमसर -तिरोडा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व सिंमेट काँक्रिटचे बांधकाम अनेक दिवसांपासून सुरु असले तरी कामातील विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींमुळे बांधकाम सध्यस्थितीत संथगतीने सुरु आहे.
ठळक मुद्देतुमसर-मोहाडी तालुक्यातील प्रकार : कंत्राटदाराने मागितली २४४५ वृक्ष तोडण्याची परवानगी