लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. परंतु विकासाच्या नावावर जुन्या डेरेदार वृक्षांची कत्तल होत आहे. तुमसर-देव्हाडी रस्त्याच्या दुपरीकरणाला आता मंजुरी मिळाली असून यामुळे शेकडो वर्ष जुने डेरेदार वृक्ष तोडले जाणार आहे. तुमसर तालुक्यात राज्य व राष्ट्रीय महामार्ग बांधकामात हजारो वृक्षांचा बळी गेला असताना आता देव्हाडी मार्गावरील वृक्षांचीही कत्तल होणार आहे.तुमसर-देव्हाडी राज्य मार्ग बांधकामाला हिरवी झेंडी मिळाली आहे. लवकरच सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होणार आहे. पाच कि.मी. या रस्त्याच्या कडेला डेरेदार मोठे जुने वृक्ष आहे. भर उन्हाळ्यात हे वृक्ष सावलीसाठी मोठा आधार ठरतात. या वृक्षांमुळे या रस्त्याचे वैभवही खुलून दिसते. परंतु आता विकासाच्या नावावर या जुन्या वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. झाडांचे आयुष्य संपले नाही. परंतु मानव निर्मित विकास कामात त्यांचा मृत्यू अटळ आहे. सदर रस्ता दुपरी राहणार आहे. झाडे वाचली पाहिजे, असे प्रत्येकालाच वाटते. परंतु शेवटी सर्वांचाच नायलाज आहे. पर्यावरण प्रेमी येथे नवीन झाडे लावण्यासाठी आग्रह धरीत आहे. परंतु वृक्षारोपण केल्यानंतर ते किती जगतात हा संशोधनाचा विषय आहे. अनेकदा तर कंत्राटदार नावापुरती वृक्षारोपण करून मोकळे होतात. एका पिढीने लावलेले झाडे दुसरी पिढी तिचा उपयोग घेतात. परंतु आता ही झाडे तोडल्यानंतर संपूर्ण रस्ता ओसाड होणार आहे.भीषण तापमानसध्या भीषण तापमान आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. अशा उन्हापासून बचावासाठी तुमसर-देव्हाडी मार्गावरील डेरेदार वृक्ष आधार ठरतात. दुचाकी, चारचाकी वाहनधारक या झाडांच्या सावलीत थांबतात. परंतु आता ही झाडे नष्ट होतील आणि सावली बेपत्ता होईल.
रस्ता बांधकामात होणार डेरेदार वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 1:23 AM
रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. परंतु विकासाच्या नावावर जुन्या डेरेदार वृक्षांची कत्तल होत आहे. तुमसर-देव्हाडी रस्त्याच्या दुपरीकरणाला आता मंजुरी मिळाली असून यामुळे शेकडो वर्ष जुने डेरेदार वृक्ष तोडले जाणार आहे.
ठळक मुद्देतुमसर-देव्हाडी रस्ता : दुपदरीकरण रस्ता बांधकामाला मंजुरी, विकास कामे देत आहेत वृक्षतोडीला आमंत्रण