शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

वडद ठरतोय ‘स्मार्ट ग्राम मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 12:50 AM

आमगाव पंचायत समिती अंतर्गत असलेली वडद ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामचे मॉडल म्हणून तालुक्यात पुढे आली आहे. या ग्रामपंचायतने लोकसहभागातून विविध नाविण्यपूर्ण उपक्रम कार्यान्वित करुन विकासाची पाऊले टाकले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत व लोकसहभागाचे फलीत : गावात विविध योजनांची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : आमगाव पंचायत समिती अंतर्गत असलेली वडद ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामचे मॉडल म्हणून तालुक्यात पुढे आली आहे. या ग्रामपंचायतने लोकसहभागातून विविध नाविण्यपूर्ण उपक्रम कार्यान्वित करुन विकासाची पाऊले टाकले आहे.सरपंच किशोर रहांगडाले यांच्या पुढाकाराने शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण कार्याला गती देण्यात आली आहे. वडद येथील १ हजार ८८ लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांसाठी मूलभूत योजना कार्यान्वित करुन स्वराज्य ग्रामची संकल्पना समोर आणण्यात आली आहे.राष्ट्रीय स्वच्छता अभियाना अंतर्गत कचऱ्याचे नियोजन, पाणी टंचाईवर उपाययोजना, शौचालयांचे बांधकाम, नियोजनात यशस्वी पाऊल, दलित वस्ती सुधार योजनेतील प्रकल्पाला पूर्ण गती देणे, वृक्ष लागवड व संवर्धनात नागरिकांचा सहभाग, स्वच्छ सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी प्रकल्प निर्मिती, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्र्य निर्मूलन उपक्रमांची नियोजने, क्रांति ज्योती महिला सक्षमीकरण प्रकल्प, यशोगाथा अंतर्गत परंपरागत शेती करणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील शेतकºयांना मग्रारोहयो योजनेतून गांडूळ खत युनिटचे लाभ मिळवून शेत पिकांसाठी खत निर्मितीची संकल्पना हाती घेतली आहे.लोकसहभागातून परसबाग लावण्याकरिता भाजीपाला बियाण्यांचा उपयोग करुन १५० लाभार्थ्यांच्या पुढाकाराने परसबाग फुलविण्यासाठी प्रत्येकी एक मिनीकेट तयार करुन लवकी, काकडी, मिरची, टमाटर, वांगी इत्यादी भाज्यांची उत्पादने घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. सेंद्रिय पद्धतीने उत्पादीत मालाला ग्राहकांच्या पसंती दिली.घरातील सांडपाणी वाचविण्यासाठी शोषखड्डे तयार करुन पाण्याचे पुनर्रभरण करण्यात आले. पशुपालकांना गोपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन या व्यवसायांतून आर्थिक संपन्नता यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.वडद ग्रामपंचायतमधील सदस्य व लोकसहभाग गावविकासात मैलाचे दगड ठरत आहे. सरपंच रहांगडाले, ग्रामसेवक सी.एस. वैद्य यांच्या संकल्पनेतून स्मार्ट ग्रामसाठी पुढाकार घेतल्याने वडद गाव तालुक्यात इतर ग्रामपंचायतींकरिता मॉडल ठरत असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे या मॉडल गावाने अगोदरच तालुक्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धेत उत्कृष्ट कार्याबद्दल पारितोषिक शासनाकडून मिळविले आहे.