भंडारा : मोबाईल वापरकर्ते दिवसेंदिवस स्मार्टफोनवर निर्भर होत आहेत. यामध्ये युवक आघाडीवर आहेत. बहुतांश यूर्जस दैनंदिनीतील ठरलेली कामे यावरुनच करीत आहेत. तसेच स्मार्टफोनमध्ये तुमची महत्त्वाची माहिती सेव्ह आहे. परंतु एखाद्या दिवशी तो हरवला किंवा चोरीला गेला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी तुमच्या वैयक्तिक माहिती व डाटाचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोनवर वाढत्या निर्भरतेबरोबर सावधानी बाळगणे आवश्यक आहे. मोबाईलवर फोन स्मार्ट होताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधा व अॅप्लिकेशन्स जोडले गेले. परिणामी मोबाईल फ्रेंडली व आवश्यक बनला. त्याचबरोबर वापरकतेर्ही स्मार्ट बनले खरे. परंतु सावधानी बाळगण्याकडे कमी लोकांचे लक्ष आहे. बहुतांश यूर्जस रात्री झोपण्यापर्यंत गुगल कीपवर डे-प्लान, ई-वॉलेट, मोबाईल रिचार्ज, सेटटॉप बॉक्स, बिल पेमेंट, यू-ट्युबवर ट्रेलर पाहणे, व्हॉटसअॅपवर मित्रांना मेसेज पोस्ट करण्यापासून फेसबुकवर अपडेट करण्यात व्यस्त असतात. स्मार्टफोन सोबत झालेली ही मैत्री धोकादायक असू शकते. सायबर तज्ज्ञांच्या मते, यामध्ये पर्सनल डेटा व माहिती साठवली जात आहे. यातून तुमची माहिती, संवाद लीकसुद्धा केले जाऊ शकतात. यासंबंधी आता सायबर सेल पोलिसांकडे तक्रारीही धडकू लागल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)
स्मार्टफोनमुळे बळावला विस्मरणाचा धोका
By admin | Published: February 04, 2015 11:09 PM