शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

साकोलीत धुंवाँधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:55 AM

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळपासूनच जिल्हाभरात पावसाला सुरूवात झाली. साकोली शहरात पाच तास धुव्वाधार पाऊस बरसल्याने अनेक वसाहती जलमय झाल्या. नागझिरा रोडवरील एकता कॉलोनीतील अनेकांच्या घरात पाणी शिरले. नाल्यांना पूर आला आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर रिपरिप : नागझिरा मार्गावरील वसाहत जलमय, नाल्यांना आला पूर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/साकोली : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळपासूनच जिल्हाभरात पावसाला सुरूवात झाली. साकोली शहरात पाच तास धुव्वाधार पाऊस बरसल्याने अनेक वसाहती जलमय झाल्या. नागझिरा रोडवरील एकता कॉलोनीतील अनेकांच्या घरात पाणी शिरले. नाल्यांना पूर आला आहे. साकोलीत या पावसाने अनेकांची दाणादान झाली.गत शनिवारपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे मंगळवारी सकाळपासून आगमन झाले. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत आहे. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात झाला. साकोली येथे दुपारी १ वाजता मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तब्बल पाच तास सारखा पाऊस बरसत होता. यावर्षीच्या पावसाळ्यातील सर्वात दमदार पाऊस मंगळवारी कोसळला. नागझिरा मार्गावरील एकता कॉलोनीतील अनेकांच्या घरात पाणी शिरले. जमनापूर जाणारा रस्ता नाल्याला आलेल्या पुरामुळे ठप्प झाला होता. शहरातील रस्त्यांवर गुढगाभर पाणी साचले होते. सायंकाळी ६ वाजतानंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिपरिप मात्र सुरू होती.भंडारा शहरात दुपारी १२ वाजताच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरींना सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत सारखा पाऊस कोसळत होता. जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, लाखनी, लाखांदूर, पवनी या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ११.६ मीमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६५७ मीमी पाऊस बरसला आहे. तो सरासरीच्या ८१ टक्के आहे.पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने उघडलेगोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाची पातळी वाढत आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणासाठी पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने मंगळवारी सायंकाळी ६ वाजता उघडण्यात आले. या धरणाची आजची जलपातळी ३१८.९३ मीटर नोंदविण्यात आली आहे. पुजारीटोला प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यानंतर वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ होते.गोसेखुर्द प्रकल्पाची शनिवारी जलपातळी २४३.२५० मीटर नोंदविण्यात आली आहे. गत २४ तासात या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात १० मीमी पावसाची नोंद झाली आहे. तीन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून ३२६.३४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ४३.४४ टक्के आहे. पुजारीटोलाचे दरवाजे उघडल्यानंतर या प्रकल्पाचेही आणखी दरवाजे उघडावे लागणार आहे.वैनगंगा दुथडी भरूनभंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. कारधा येथे वैनगंगेची पातळी मंगळवारी २४३.२२ मीटर नोंदविण्यात आली. ४९९९.७५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून याठिकाणी २४५ मीटर धोक्याची पातळी आहे. वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर