साकाेली लगत २२ लाख ५० हजार रुपयांची वाटमारी झाली हाेती. या प्रकरणात पाेलिसांनी आठ जणांना अटक केली. तेथून तांदूळ तस्करीचे प्रकरण पुढे आले. पाेलिसांनी या प्रकरणाची चाैकशी सुुरू केली. जिल्हाधिकारी कार्यालय, आयकर विभाग, जीएसटी विभागाकडील अहवाल मागितला. परंतु, अद्यापही हा अहवाल प्राप्त झाला नाही.
राजकीय हस्तक्षेप आणि पैशाच्या बळावर अहवाल दडपण्यात आल्याची माहिती आहे. पाेलिसांनीही या प्रकरणाची चाैकशी थंडबस्त्यात ठेवली आहे.
ताे अधिकारी काेण?
तांदूळ तस्करी प्रकरण दडपण्यासाठी एका अधिकाऱ्याने १० ते १२ लाख रुपयांची मांडवली केल्याची चर्चा आहे. तेलंगणाच्या अण्णाने साकाेलीत बयान दिल्यानंतर प्रकरण थंडबस्त्यात गेले आहे. नेमके काय झाले हे कळायला मार्ग नाही. परंतु मांडवली करणारा ताे अधिकारी काेण?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.