शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

साप कधीच सूडभावनेने वागत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:29 PM

सापाला कान नसतात त्यामुळे सापाला ऐकू येत नाही. मेंदु लहान असल्यामुळे स्मरणशक्ती कमजोर असते. साप डूख धरत नाही.

ठळक मुद्देराहुल डोंगरे : मोहाडी खापा येथे समाज प्रबोधनातून प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सापाला कान नसतात त्यामुळे सापाला ऐकू येत नाही. मेंदु लहान असल्यामुळे स्मरणशक्ती कमजोर असते. साप डूख धरत नाही. सापाच्या अंगावर केस नसतात. सापाच्या डोक्यावर कोणताही मणी नसतो. नागमणी म्हणून विकले जाणारे खडे हे बेझाईनचे असतात. सापाबद्दल समाजात चुकीचे विचार, अंधश्रध्दा पेरल्या गेल्या आहेत. मंत्राने, बाºयानी सापाचे विष उतरत नाही. पेशनीचा साप हा कधीच राहत नाही. साप कधीच सुड घेत नाही. नव्वद टक्के साप बिनविषारी असतात. जर सापाने दंश केल्यास लगेच त्याला रुग्णालयात नेणे हा एकमेव उपाय आहे. सर्प प्रतिबंधात्मक लसीमुळे दंश झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचविता येते. तेव्हा जनतेने अंधश्रध्देला बळी पडू नये असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तुमसर तालुका संघटक राहुल डोंगरे यांनी केले. ते पोलीस ठाणे सिहोराच्यावतीने आयोजित अंधश्रध्दा निर्मुलन या विषयावर समाज प्रबोधन कार्यक्रम मोहाडी खापा येथे समाज प्रबोधन करत असताना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिहोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोहर कोरेटी तर प्रमुख अतिथी म्हणून वासू चरडे, पोलीस उपनिरीक्षक ए. जी. जटाल, सरपंच कुवरलाल बुध्दे, पंचायत समिती सदस्य विमला कानतोडे, पोलीस पाटील कैलास मिरासे, माजी सरपंच अंबादास कानतोडे, मनोहर शरणागत, ग्रा.पं. सदस्या कविता शरणागत, सुनिल माने, हरीद्वार पटले, रामदयाल पटले, संतोष शरणागत, शामराव बुध्दे, रंजित बुध्दे, ओमप्रकाश शरणागत आदी उपस्थित होते.राहूल डोंगरे पुढे म्हणाले की, सापाबद्दल समाजात चुकीचे विचार पेरले गेले आहेत जसे सर्पदंशाच्या ठिकाणी नागवेलीचे मुळ उगाळून लावल्यास उलटीवाटे विष बाहेर पडते. सापाचे विष मंत्रतंत्राने उतरवता येते. कजरीच्या बिया खाल्यास सर्पविष बाधत नाही. याप्रकारच्या गोष्टीवर लोकांनी विश्वास ठेवू नये. सापाला कधी दुध पाजू नये. भुत भानामती जादूटोना या जगात कोठेही नाही. हे पटवून देण्यासाठी त्यांनी चिठ्ठीच्या प्रयोगातून कानाने चिठ्ठी वाचून समाजाला चिकित्सा करुन वैज्ञानिक दृष्टीकोण जागृत करण्याचा प्रयत्न केला व गावातील जी मंडळी मंत्रतंत्राच्या साहाय्याने गडेदोरे, पाणी भरुन देणे, बाºयाच्याद्वारे बाधीत व्यक्तीची दिशाभुल करणे बंद करण्याचे आवाहन केले. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेतात त्यांचे प्राण वाचते व जे मंत्रतंत्रावर विश्वास ठेवून ढोंगी बुवाला बळी पडतात. त्यांना प्राणास मुकावे लागते. समाजात शांतता व सुव्यवस्था नांदण्यासाठी प्रत्येकानी आपले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी व वैज्ञानिक दृष्टीकोण जागवून देशाला बळकट करावे अशी विनंती केली जर लोकांनी अंधश्रध्देला खतपाणी घातले तर जादूटोणा विरोधी कायदयांतर्गत पोलीस प्रशासन कारवाई करेल तेव्हा आता तरी जागे व्हा असा मोलाचा संदेश दिला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सरपंच कुवरलाल बुध्दे यांनी केले.