इंद्रपाल कटकवार
भंडारा : कोरोना महामारी ने सर्वांनाच सळो की पळो की पळो करून सोडले. आता कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंटने राज्यात एन्ट्री मारली आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसने शिरकाव केला नसला तरी भविष्यात नियमांचे पालन न केल्यास डेल्टा प्लसबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सक्रिय रुग्णसंख्या ही ७९ झाली आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन व्हॅरिएंटने नऊ जिल्ह्यात शिरकाव घातला आहे. विदर्भात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण सध्यातरी आढळलेला नाही. मात्र झपाट्याने याचा प्रसार होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा आरोग्य प्रशासनही सतर्क झाले आहे. त्या दिशेने आरोग्य विभागाने पाऊलही उचलले आहेत. दररोज कोरोना संदर्भात कोरोना रुग्णांची चाचणीदरम्यान डेल्टा प्लस कुठल्याही रुग्णाला सध्यातरी आढळलेला नाही. परंतु याबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत रुग्ण आढळला नसला तरी त्याच्या शिरकाव होईल, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. परिणामी या संदर्भात नागरिकांनी स्वतःहून नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मास्क, सॅनिटायजर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कोरोनाच्या डेल्टा प्लसने चिंता सध्या नसली तरी येणार्या दिवसांत याबाबत काळजी घेणे, अत्यंत आवश्यक झाले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन त्या अनुषंगाने उपाययोजना व आराखडाही तयार करीत असल्याचे समजते.
बॉक्स
जिल्ह्यात चाचपणी सुरू
दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोना महामारीत हजारो रुग्ण आढळले. त्यानंतर सातत्याने दररोज अनेक व्यक्तींची चाचणी केली आहे. साडेचार लाखांपेक्षा जास्त जणांची चाचणी करण्यात आली आहे. सध्या कोरोना रुग्ण कमी आढळत असले तरी पूर्ण चाचपणी सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी ५३५ व्यक्तींची चाचपणी करण्यात आली आहे. त्यापैकी नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोट बॉक्स
जिल्ह्यात काय खबरदारी
सध्या विदर्भात कोरोनाच्या डेल्टा प्लसचा कुठलाही रुग्ण आढळून आलेला नाही. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात रुग्ण आढळून आला नाही. मात्र भंडारा जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्कता बाळगून आहे. मात्र डेल्टा प्लस रुग्ण आढळल्यास रुग्ण राहत असलेला क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करणे अपेक्षित आहे. त्या दिशेने विचारही सुरू आहे. मात्र पूर्वीच्या रूपाने अधिक तीव्र असल्याने नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे फारच गरजेचे आहे. मास्क व सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छता नियमांचे पालन काटेकोरपणे करायला हवे.
-डॉ. रियाज फारुकी, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा