इंग्रजी शाळांनी मार्च २०२० पासून ऑनलाईन पध्दतीने शिक्षण दिले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काटेकाेरपणे पालन केले जात आहे. परंतु काही राजकीय हेतुने प्रेरीत मंडळी पालकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. शाळा नाही तर शुल्क नाही असा भ्रामक प्रचार करीत आहे. त्यामुळे असंताेष निर्माण हाेत आहे. यावर ताेडगा काढला नाही तर येत्या १ जुलैपासून सुरु हाेणाऱ्या शैक्षणिक सत्रात आम्ही शाळा सुरु करु शकणार असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर फादर प्रकाश, सैमुअल, श्रृति ओहळे, मुरलीधर भरे, भास्कर, निलेश गाेंदुळे, मनाेज सांतलवार, फादर जाॅन, विमल राॅय, रमेश निमकर, अशाेक गिरीपुंजे, बेबी थाॅमस्, रविना अंबुलकर, डाॅ. आशिष पालीवाल, आशिष बहरे, सुरेश पशिने, नितीन कटकवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तर इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद कराव्या लागतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:23 AM