भंडारा जिल्ह्यात २७ एप्रिल २०२० रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळल्यानंतर दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. एकट्या एप्रिल महिन्यात ३३ हजारांपेक्षा अधिक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आलेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ३७८ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात भंडारा तालुक्यात २३ हजार ८२२, मोहाडी ४,१५७, तुमसर ६,८५२, पवनी ५,८३८, लाखनी ६,२१०, साकोली ६,७७५, लाखांदूर २,७२४ रुग्णांचा समावेश होता. ज्या वेगाने कोरोना संसर्ग वाढला त्याच्या दुप्पट वेगाने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचे सध्या दिसत आहे. आतापर्यंत ५० हजार ४७७ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात ४,९१२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. गत महिन्यात ही संख्या १३ हजारांपर्यंत गेली होती. सध्या भंडारा तालुक्यात १,५९१, मोहाडी २१५, तुमसर ५४५, पवनी ३०९, लाखनी ६२२, साकोली १४७५, लाखांदूर १५५ ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
बाॅक्स
मंगळवारी ६५२ कोरोनामुक्त, २१७ पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात मंगळवारी २१८३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ७९, मोहाडी ५, तुमसर २५, पवनी २१, लाखनी २८, साकोली ६४ आणि लाखांदूर तालुक्यात १७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तर ६५२ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात भंडारा तालुक्यात ६, साकोली २ आणि मोहाडी व लाखनी येथे प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. गत महिन्यात रुग्ण बरे होण्याचा दर खाली आला होता. परंतु तो आता ८९.५३ वर आला आहे. रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळत आहे.
तालुकानिहाय बरे झालेले रुग्ण
तालुकाएकूण रुग्णबरे झालेले रुग्ण
भंडारा २३,८३२ २१,७६२
मोहाडी ४१,५७ ३,८५२
तुमसर ६,८५२ ६,२००
पवनी ५,८३८ ५,४३०
लाखनी ६,२१० ५,५०३
साकोली ६,७७५ ५,२०५
लाखांदूर २,७२४ २,५२५
एकूण ५६,३७८ ५०,४७७