आॅनलाईन लोकमतमोहाडी : सव्वीस जानेवारी हा दिवस रोहणा या गावात पटाचा दिवस. पन्नास वर्षापूर्वी पटाचा दिवस नेमला गेला होता. वर्षा मागे वर्ष गेली पण, पटाचा उत्साह तोच असायचा. तथापी, पटबंदीने पटावर संक्रात आली. परंतू गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण देण्यासाठी तरुण सरपंच नरेश ईश्वरकर यांनी पटाला पर्याय म्हणून शंकर पटाच्या जागी कुस्ती स्पर्धा भरवली. पहिल्यांच वर्षी रोहण्यात तब्बल तीन दिवस कुस्त्यांचा फड रंगला. कुस्ती स्पर्धेने पटाची उणीव भरुन काढल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.रोहणा या गावात १९४७ सालपासून शंकर पटाला सुरुवात झाल्याचे सांगितल्या जाते. २६ जानेवारी रोहणा गावात सांस्कृतिक जलसा साजरा होता. साठ वर्षानंतरही गावातल्या सांस्कृतिक पर्वनीला नवीन पिढीनेही खंड पडू दिला नाही. रोहणा येथील किसन बुराडे, डोमाजी बोंदरे, झिबल ईश्वरकर, सुकल टिचकुले, शिवराम झंझाड या व्यक्तींनी शंकर पटाची बीजे रोवली. रोहणा परिक्षेत्रात शंकरपटाने विशेष ओळख करुन दिली. २६ जानेवारी म्हणजे रोहण्याचा पट असाच उल्लेख आजही होतो.रोहणा या गावातील पटाने अनेक स्थित्यंतरे बघितली आहेत. अवघड परिस्थितीतही पटाची परंपरा गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. पटाच्या दानीवर एक बैलजोडी हाकलून पटाची पर्वणी सुरु करणाऱ्यांना मानाची सलामी दिली. तसेच परंपरेलाही गावकºयांनी जपले. पण, शासनाने शंकरपटावर बंदी घातल्याने रोहण्यात बैलाच्या पटाला पर्याय म्हणून कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. तीन दिवस चाललेल्या कुस्ती फंडात २५० च्या वर पुरुष महिला सहभागी झाले होते. अतिशय छान कुस्तीच्या स्पर्धेने रंगत आणली होती. गावातील पुरुष-महिला मंडळीनी कुस्त्यांच्या आश्वाद घेतला. शंकरपटाची उणीव कुस्ती स्पर्धेने जाणवू दिली नाही. रोहणा या गावातही आखाडा आहे. येथेही मल्ल तयार होतात. लाल ताीत खेळलेला तरुण सरपंच नरेश ईश्वरकर यांनी शालेय कुस्ती स्पर्धेत व अनेक ठिकाणी आयोजित होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत नाव कमावले आहे. उत्कृष्ठ मल्ल म्हणून नाव कमावलेल्या या सरपंचाने गावात पटाला पर्याय कुस्तीचा दिला. पहिल्याच वर्षी भव्य कुस्तीचा आखाडा रंगला. त्यामुळे गावात होणाऱ्या पाहुण्यांना रंगतदार कुस्तीचा सोहळा बघता आला. रोहण्यात पाहुण्यांना मेजवाणीसाठी नवटंकी नाटक, तमाशा आदी कार्यक्रमाचे आयोजनही केले. खास करुन या तीन दिवशी मुलींच्या लग्न जोडाजोडीचा विशेषत्वाने कार्यक्रम आखला जातो. या तीन दिवस अनेक मुला-मुलींचे लग्न जोडले जातात.रोहण्यात प्रत्येक घरी पाहुणे येतात. कधी काळी तर पाहुण्यांचे सामुहिक जेवणही व्हायचे एवढे पाहुणे रोहण्यात येत असल्याचे वृध्द यादोराव भगत यांीन लोकमतला सांगितले.
मातीतील कुस्ती आता गादीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:28 PM
आॅनलाईन लोकमतमोहाडी : सव्वीस जानेवारी हा दिवस रोहणा या गावात पटाचा दिवस. पन्नास वर्षापूर्वी पटाचा दिवस नेमला गेला होता. वर्षा मागे वर्ष गेली पण, पटाचा उत्साह तोच असायचा. तथापी, पटबंदीने पटावर संक्रात आली. परंतू गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण देण्यासाठी तरुण सरपंच नरेश ईश्वरकर यांनी पटाला पर्याय म्हणून शंकर पटाच्या जागी कुस्ती ...
ठळक मुद्देपरंपरेला पर्याय: रोहणा येथे रंगला कुस्त्यांचा फड