प्रथम येणाऱ्यास प्राधान्य : योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनभंडारा : जिल्ह्यात शासनाने १९५ सौर कृषी पंप ९५ टक्के अनुदानावर आस्थापित करण्याचे निश्चित क ेले आहे. अटल सौर कृषीपंप योजना अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येत असून ५ एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरीवर किंवा शेततळ्यांवर अटल सौर कृषीपंप योजनेमध्ये सहभाग घेण्याकरिता शेतकरी अर्ज करू शकतात. जिल्ह्यात आजपर्यंत ६१ कृषी पंप आस्थापित व कार्यान्वित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सौर कृषीपंपाची कार्यपद्धती व फायदे समजविण्याकरिता प्रात्यक्षिक दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नजीकच्या महावितरण कार्यालयात भेट देवून ३० मार्च २०१७ पर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.या योजनेत १० वर्षाचा विमा व १० वर्षाची निगा व दुरुस्ती यांचा समावेश आहे. शासनाने ५ एकरापर्यंतची अट शिथील केली असून आता १० एकर शेती असलेला शेतकरी यात भाग घेवू शकतो. परंतु त्याकरिता त्यांना १५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागेल.सौर कृषीपंपाचे फायदेयोजनेत ९५ टक्के शासनाकडून अनुदान असून लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के हिस्सा भरावयाचा आहे. शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे वीज बिल व इतर चार्जेस भरावी लागत नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना दिवसा ८ तास व रात्री १० तास याप्रमाणे चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. परंतु सौर कृषीपंपामार्फत शेतकऱ्यांना जवळपास १० ते १२ तास दिसालाच वीज पुरवठा उपलब्ध असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्याकरिता रात्रीला जाण्याची आवश्यकता नाहदी. शेतकऱ्यांनी सौर कृषीपंप योजनेमध्ये सहभाग घेतल्यास तेथे शिल्लक असणारी वीज दुसऱ्या ग्राहकास उपलब्ध करून देता येईल. त्यामुळे सुद्धा भारनियमनाचे प्रमाण कमी होऊ शकते. नैसर्गिक आपत्तीमुळे व वादळामुळे लाईनमध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा खंडीत होतो. या योजनेमध्ये ती स्थिती उद्भवणार नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांची वर्षाला ८ ते १० हजार इतकी बचत होत आहे. भविष्यामध्ये शेतीपंपाचे विजेचे दर वाढू शकतात. त्यामुळे १० वर्षाचा विचार केल्यास शेतकऱ्यांना वीज बिलापोटी शेतकऱ्यांना २ लाख रुपयाच्यावर लाभ होवू शकतो. ज्या शेतकऱ्यांने १० वर्षाकरिता विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्काची आवश्यकता नाही. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच चोरीमुळे नुकसान झाल्यास त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. १० वर्ष देखभाल व दुरुस्तीचा करण्याची योजनेत तरतूद आहे. शेतकरी १० वर्षानंतर पारंपारिक पद्धतीचा वीज जोडणीकरिता अर्ज करू शकतात. अटल सौर कृषीपंप योजनेमार्फत विशेष वीज रोधक योजना बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे आकाशातून पडणाऱ्या विजेपासून संरक्षण मिळेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे मोबाईलद्वारे किंवा संगणकाद्वारे घर बसल्या संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. वीज निर्मिती करिता लागणाऱ्या कोळशाची तसेच पाण्याची बचत होणार. त्यामुळे प्रदूषण कमी करण्याकरिता मदत होईल. या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जासोबत सातबाराचा उतारा, अल्प भूधारक असल्याचा दाखला, आधारकार्ड व इतर कागदपत्रांची आवश्यकता आहे. (नगर प्रतिनिधी)
६० शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप कार्यान्वित
By admin | Published: February 09, 2017 12:28 AM