भंडारा जिल्हा भात पिकाचा, पितळी भांडी तयार करण्याचा, मजूर कामगारांचा व कलावंतांचा जिल्हा आहे. या ठिकाणी जुन्या काळापासून पितळी भांडी मोठ्या प्रमाणात तयार करण्याचे काम होत होते. परंतु आज पितळी भांड्यांचे कारखाने बंद पडले आहेत. तसेच जिल्ह्यात मोठे कारखाने नाहीत. येथील अनेक नागरिक इमारत, रस्ते बांधकाम व शेतमजूर आहेत. भारुड, गोंधळ, दंडार, तमाशे, शाहिरी यासारख्या अनेक कला सादर करून कलावंत आपली उपजीविका पार पाडत असतात. परंतु आज कोरोनाकाळात सर्व मजूर, कामगार, कलावंतांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे सावट आले आहे. त्यातच इमारत बांधकाम करणाऱ्या मजुरांसाठी सरकारने मदत देण्याची घोषणा केली होती, ती मदत अनेक कामगारांना मिळाली नाही.
निवेदन देताना राष्ट्रीय मजूर संघाचे अध्यक्ष धनराज साठवणे, जिल्हा महासचिव महेंद्र वाहाणे, जिल्हा उपाध्यक्ष जीवनभाऊ भजनकर, तालुका अध्यक्ष लखन चौरे, शहर अध्यक्षा स्नेहा भोवते, लाखनी तालुका महिला अध्यक्षा संध्याताई धांडे, लाखनी शहर महिला उपाध्यक्षा सुनंदा धनजोडे, जिजा तुमदाम, सुनंदा वाघाये, वीणा नागलवाडे, मंगला परतेकी, सीमा बन्सोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.