आॅनलाईन लोकमतवरठी : कामगारावर होणारे अन्याय खपवून घेतले जाणार नाही. राज्य शासनाच्या ध्येय धोरणानुसार सर्व कामगारांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. कंपनीत काम करणारे रोजनदारी कामगार व स्थायी कामगार यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी व्यवस्थापनाने घ्यावी, जनरल वर्गातील कामगारांच्या समस्या आठवडाभरात सोडवाव्यात, अशा सूचना आमदार चरण वाघमारे यांनी शनिवारला व्यवस्थापन, कामगार संघटना यांच्या बैठकीत दिल्या. चर्चेत कामगाराच्या अनेक मागण्या सोडविण्याचे अश्वसन देण्यात आले.सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत जनरल वर्गात ८५० च्या जवळपास कामगार काम करतात. हे कामगार कंत्राटी असले तरी सर्व प्रकारचे कामे त्यांचेकडून करवून घेतल्या जातात. इतर कामगाराच्या तुलनेत त्यांना मिळणार वेतन समाधानकारक नाही. यापैकी अनेक कामगार आठ ते दहा वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांना समान काम समान वेतन प्रमाणे किमान वेतन मिळत नाही. अनेक कामगार मूलभूत हक्कापासून वंचित आहेत. कामगारांना लागू असलेले नियम धाब्यावर ठेवून १५० ते २०० रुपये रोजी प्रमाणे काम करवून घेतले जाते. रजेच्या दिवसाचे वेतन कापण्यात येते. कुशल व अकुशल कामगारांना एक सारखे निकष लावून हमालप्रमाणे काम देण्यात येते, अशा अनेक समस्या पासून शेकडो त्रस्त कामगारांनी आमदार चरण वाघमारे यांच्याकडे कैफियत मांडली.कामगाराच्या प्रश्नावर आमदार यांनी सनफ्लॅग व्यवस्थापन अधिकारी सतीश श्रीवास्तव, संचालक दळवी व गणेश असाटी यांच्या सोबत बैठक लावून सर्व विषय आक्रमकतेने सोडवून घेतले. यावेळी रवी येळणे, मिलिंद रामटेके, उपसरपंच सुमित पाटील, निरंजना साठवणे, राष्ट्रपाल नारनवरे, अरविंद येळणे, अतुल भोवते, रवी लांजेवार, महेश कलंबे, माजी सभापती हरिश्चंद्र बांधटे उपस्थित होते. कामगाराच्या वतीने माजी सरपंच निरंजना साठवणे, रवी येळणे, सुमित पाटील, अतुल भोवते व अरविंद येळणे यांनी व्यवस्थापनासमोर मुद्दे रेटून धरले. कर्मचाऱ्यावर होणाºया अन्यायाचा पाढा आमदार यांच्या समोर वाचला. काही काळापुरती तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र आमदारांच्या मध्यस्थीने समस्या सुटली.
कामगारांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:33 PM
कामगारावर होणारे अन्याय खपवून घेतले जाणार नाही. राज्य शासनाच्या ध्येय धोरणानुसार सर्व कामगारांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. कंपनीत काम करणारे रोजनदारी कामगार व स्थायी कामगार यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी व्यवस्थापनाने घ्यावी, जनरल वर्गातील कामगारांच्या समस्या आठवडाभरात सोडवाव्यात, अशा सूचना आमदार चरण वाघमारे यांनी शनिवारला व्यवस्थापन, कामगार संघटना यांच्या बैठकीत दिल्या.
ठळक मुद्देवाघमारे यांची सनफ्लॅग व्यवस्थापनाला सूचना : आठवडाभरात समस्या सोडविणार