यावेळी दिलेल्या निवेदनात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून खंड दोन प्रसिद्ध करावा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन वाढवून अनुक्रमे ३० व ४० हजार रुपये करावेत, प्राथमिक शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश देऊन भेदभाव थांबवावा, २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नये, अंशदान पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षकांच्या मृत्यू झाल्यावर वारसाला विनाअट दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, शिक्षकांना वैद्यकीय उपचारासाठी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी १०, २०, ३० ची आश्वासित योजना लागू करावी, वस्ती शाळेत नेमणूक केलेल्या शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी मूळ नेमणूक दिनांक ग्राह्य धरावा, प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी फी माफीसाठी आर्थिक तरतूद करावी, उच्च प्राथमिक शाळेला विनाअट मुख्याध्यापक व सेवक पदाला मान्यता द्यावी, जिल्हा परिषद केंद्रीय शाळेसाठी संगणक ऑपरेटर किंवा लिपिकाची पद मान्य करावे, राज्यात १९९२ नंतर निर्माण केलेल्या नवीन तालुक्यातील गटशिक्षण कार्यालयात लिपिक व सेवकांच्या पदास मान्यता द्यावी, केंद्रप्रमुखांची राज्यातील रिक्त असलेली ८० टक्के पदी पदवीधर शिक्षकांतून भरण्यात यावी, शिक्षकांना बीपीएल इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करावे जिल्हा परिषद शाळेतील वीज देयके जिल्हा परिषदेच्या फंडातून भरण्यात यावी, अप्रशिक्षित शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी मूळ नेमणूक दिनांक ग्राह्य धरावा, उच्चश्रेणी, विषयशिक्षक या पदोन्नत्या कराव्यात, उच्चशिक्षित शिक्षकांना त्याच्या धारकतेनुसार विकल्पाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून बढती द्यावी, वरिष्ठ व निवड श्रेणीचे रखडलेले प्रकरणे निकालात काढून सर्व पात्र शिक्षकांना लाभ घ्यावा, वैद्यकीय प्रतिपूर्ती तसेच इतर थकबाकीसाठी आर्थिक तरतूद करावी, दर महिन्याच्या पगारासाठी आवश्यक निधी आधीच वळता करावा, पगारासाठी सीएमपी पद्धतीचा अवलंब करावा आदी मागण्यांचा समावेश होता. या सर्व मागण्या न्याय्य असून त्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात शिष्टमंडळासमवेत बैठक घेऊन प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संघाच्या शिष्टमंडळाला दिले.
जिल्हा संघ भंडाराच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, सुधीर वाघमारे, राजेश सूर्यवंशी, मुकेश मेश्राम, राजू सिंगणजुडे, संजीव बावनकर, रमेश काटेखाये, दिलीप बावनकर, राधेश्याम आमकर, राजन सव्वालाखे, शंकर नखाते, नरेश देशमुख, विनायक मोथरकर, सेवकराम हटवार, रमेश लोणारे, रजनी करंजेकर, दिलीप गभने, भास्कर खेडीकर, अशोक मेश्राम आदींनी राज्य संघाचे आभार मानले.